आज सुस येथे २४x७ समान पाणी पुरवठा योजने अंतर्गत सुरु झालेल्या पाण्याच्या लाईनच्या कामाची पाहणी माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी केली. महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभहस्ते व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री.चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रयत्नातुन काही महिन्यांपुर्वी या कामाचे भुमिपुजन करण्यात आले व आता प्रत्यक्षात याकामाची सुरुवात झाली आहे.
याबद्दल माहिती देताना माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सांगितले की, पाण्याच्या लाईनचे काम सध्या सुस-म्हाळुंगे गावांच्या हद्दीवर सुरु असुन यामध्ये १८०० मी.लांबीच्या दोन लाईन त्यामध्ये २० इंच व्यासाची ट्रान्समिशन लाईन व ६ इंच व्यासाच्या डिस्ट्रिब्युशन लाईन टाकण्याचे काम आता प्रत्यक्षात सुरु करण्यात आले आहे. लवकरच या पाईप लाईनचे काम पुर्ण होवुन या नव्याने समाविष्ट सुस-म्हाळुंगे गावांना देखिल समान पाणी पुरवठा करण्यात येईल. या सर्व कामांची माहिती परिसरातील विविध सोसायटींमधील नागरीकांना दिली. विबग्योर स्कूल परिसरातील सुस-म्हाळुंगे हद्दीवरील सोसायटी धारकांना लवकरच मिळणार हक्काचं पाणी मिळणार आहे.
यावेळी महानगरपालिकेचे शाखा अभियंता श्री.अशोक सांगडे व ठेकेदारामार्फत प्रोजेक्ट मॅनेजर श्री.शिवाजी साळुंखे यांनी सर्व नकाशांसह परिसरातील नागरीकांना या कामाची माहिती दिली.
यावेळी माजी नगरसेविका सौ.ज्योतीताई कळमकर, माजी नगरसेविका सौ.स्वप्नालीताई सायकर, मा.सरपंच नारायणजी चांदेरे. मा.सरपंच काळुरामजी गायकवाड, मा.सरपंच राजेंद्रजी पाडाळे, मनपा शाखा अभियंता अशोक सांगडे, ठेकेदार प्रोजेक्ट मॅनेजर शिवाजी साळुंखे, सोसायटीमधील विश्वासजी शास्त्री, संदिपजी प्रधान, विजयराव देशपांडे, सुनुल देशमुख, रविंद्र वैद्य व परिसरातील इतर नागरीक उपस्थित होते.
More Stories
नवीन समाविष्ट ३४ गावांच्या ९ नियुक्त लोकप्रतिनिधी मध्ये बाबुराव चांदेरे यांची वर्णी, महाराष्ट्र शासनाकडून अध्यादेश जारी..
सूसगाव येथील बेलाकासा सोसायटीजवळ बांधकाम साईटवर काम करणाऱ्या कामगारांच्या वसाहतीत आग, वीस घरे जळून खाक, तीन सिलिंडर चे स्फोट…
पेरिविंकल च्या सुस शाखेत प्री -प्रायमरीतील चिमुकल्यांचा पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न!!!