September 17, 2024

Samrajya Ladha

सुस ते श्री क्षेत्र पंढरपूर येथे धर्मशाळा वर्धापन दिन कार्यक्रमाला वारकऱ्यांना जाण्यासाठी डॉ. दिलीप मुरकुटे यांनी केली गाड्यांची व्यवस्था.

सुस :

सुस येथील नागरिकांसाठी श्री शेत्र पंढरपूर या ठिकाणी श्री संत सेवा धर्मशाळा वर्धापन दिन व विठ्ठल रुक्मिणी प्राणप्रतिष्ठा समारंभास जाण्यासाठी गाड्यांची व्यवस्था डॉ. दिलीप मुरकुटे पाटील (शिवसैनिक/संस्थापक बाणेर नागरी पतसंस्था) यांच्या वतीने करण्यात आली.

सुसगाव मध्ये फार मोठ्या प्रमाणात सांप्रदायिक क्षेत्रातील नागरिक आहेत. पंढरपूर वारीसाठी मोठ्या संख्येने वारकरी गावातून जात असतात. श्री क्षेत्र पंढरपूर येथील संत सेवा धर्मशाळेचा वर्धापन दिन व विठ्ठल रुक्मिणी प्राणप्रतिष्ठा समारंभ याचे निमित्त साधून वारकऱ्यांसाठी समारंभात जाण्याकरता गाड्यांची व्यवस्था केली. यानिमित्ताने वारकऱ्यांची सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे : डॉ. दिलीप मुरकुटे पाटील(शिवसैनिक/संस्थापक बाणेर नागरी पतसंस्था)

त्यावेळी बाणेर नागरी सहकारी पतसंस्था पिरंगुट शाखेचे शाखाध्यक्ष राम गायकवाड उपस्थित होते, तसेच सुस गावातील वारकरी संप्रदायातील वसंत भवर चांदेरे, विलास चांदेरे, शंकर लक्ष्मण चांदेरे, बबन चांदेरे, सुदाम भोते, रमेश शिंदे, राजेश कांबळे, शंकर मारुती चांदेरे, संभाजी वायकर, मधू ससार, शिवराम चांदेरे, सुखदेव विठोबा चांदेरे, दत्ता लक्ष्मन चांदेरे, ज्ञानमाता चांदेरे, विठ्ठल दगडे, विलास ससार, लक्ष्मण फणसे, रामभाऊ (भगत) चांदेरे, हनुमंत चांदेरे, संतोष भोसले आदी उपस्थित होते.