June 19, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

हनुमान विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी तुकाराम पवार तर व्हाईस चेअरमन पदी महेश पाडळे यांची निवड..

सुसगाव :

हनुमान विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी सूस, म्हाळुंगे, बावधन च्या चेअरमनपदी तुकाराम भिकाजी पवार तर वाईस चेअरमनपदी महेश तानाजी पाडळे यांची निवड झाली.

 

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन सुनील चांदणे यांनी सोसायटीच्या सर्व संचालक चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी माळवदकर साहेब, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन सुनीलभाऊ चांदेरे, पुणे जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष सुहास भोते, सेक्रेटरी जाधव आणि सर्व संचालक उपस्थित होते.