November 21, 2024

Samrajya Ladha

हुतात्मा जवान सोपान पाडाळे यांची जन्म भूमि असलेल्या म्हाळुंगे गावातील माती शहीद जवानांच्या सन्मानार्थ हुतात्मा स्मारक दिल्ली येथे “अमृत वाटिका” उद्यान साठी वापरण्यात येणार…

म्हाळुंगे :

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील शहीद जवानांच्या सन्मानार्थ हुतात्मा स्मारक दिल्ली येथे “अमृत वाटिका” उद्यान उभारण्यात येणार आहे. सदर उद्यानासाठी हुतात्मा जवानांच्या घरची माती वापरणार आहे. हुतात्मा जवान सोपान पोपट पाडाळे यांची जन्म भूमि असलेल्या म्हाळुंगे गावातील माती सदर “अमृत वाटिका” दिल्ली साठी पाठविण्यात आली व मुळशी तालुक्यातील माजी सैनिक यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे संयोजन भाजपा पुणे शहर सहकार आघाडीचे उपाध्यक्ष काळुराम गुलाब गायकवाड यांनी केले आहे.

या कार्यक्रमासाठी मुळशी ता. भाजपा अध्यक्ष विनायक ठोंबरे, भाजपा जिल्हा सरचिटणीस जीवन साखरे, मुळशी भाजपा सरचिटणीस शाम धुमाळ, वेगरे गावचे सरपंच मिनाद कानगुडे, सोपान निबूदे व शहीद जवान सोपान पाडाळे यांच्या धर्म पत्नी श्रीमती जयश्री सोपान पाडाळे व त्यांचे बंधू ज्ञानेश्वर पोपट पाडाळे, मा. सैनिक भगवान खैरे मा. सैनिक शशिकांत कांबळे, मा. सैनिक सुरज खैरे,
नाद गडांचा ग्रुपचे अध्यक्ष संतोष पाडाळे व सदाशिव मोरे भाजपा कार्यकर्ते व म्हाळुंगे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.