सोमेश्वरवाडी :
सोमेश्वरवाडी येथील भाजपा कोथरूड विधानसभा उपाध्यक्ष सचिन दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महा आरोग्य शिबिराचे उद्घाटन ह.भ.प शांताराम महाराज निम्हण, ह.भ.प. पांडुरंग आप्पा दातार, माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर, माजी नगरसेविका ज्योती कळमकर यांच्या हस्ते झाले. सायंकाळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करून अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला. नागरिकांनी मोठा प्रतिसाद आरोग्य शिबीराला दिला.
यावेळी बोलताना माजी महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले की, समाजाप्रती कर्तव्याची जाणीव ठेवून काम करणारा कार्यकर्ता म्हणून आम्ही सचिन दळवी यांच्याकडे पाहतो. सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम सचिन ने राबविले. समाजाला आधार वाटेल अशा प्रकारचे काम करत राहावे अशी सदिच्छा भविष्यात अशाच प्रकारे चांगले काम करत राहावे. निरोगी आयुष्य लाभो या वाढदिवसाच्या शुभेच्छा.
यावेळी भाजपा नेते गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, भाजपा युवा नेते लहू बालवडकर, कोथरूड विधानसभा अध्यक्ष पुनीत जोशी, युवा नेते शिवम सुतार, सागर बालवडकर, मोरेश्वर बालवडकर, सचिन वाडेकर, श्याम काकडे, जगन्नाथ दळवी, मधू दळवी, नवनाथ ववले, चिंतामण दळवी, खंडू शेठ आरगडे, रघुनाथ निम्हण, ज्ञानोबा आरगडे, राजा भाऊ सुतार, रोहिदास घोलप, मनोहर आरगडे, बारिकराव जोरे, बाळासाहेब निम्हण, गिरिधर राठी, नितीन चांदेरे, गणेश सुतार, सुखदेव चांदेरे, रोहिदास कोकाटे, उत्तम जाधव, सुनील खुळे, बाळासाहेब मांडेकर, भरत जोरे, समस्त सोमेश्वरवाडी ग्रामस्थ, कार्यकर्ते आणि मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, बाणेर, बालेवाडी, सूस परिसरातील विविध विकास कामांचा भूमी पूजन सोहळा संपन्न..
महिला दिन विशेष : सोनाली प्रकाश पवार (‘रिद्धीमा ब्युटी सलोन’)
सोमेश्वरवाडी येथे नारी शक्तीवंदन आणि रॅली मध्ये महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..