सुतारवाडी :
सुतारवाडी गावामध्ये स्थानिक ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेवुन पुणे मनपा क्षेत्रिय अधिकारी व अभियत्यांसमवेत माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी तेथील समस्यांची पाहणी केली.
याबद्दल माहिती देताना माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सांगितले की, सुतारवाडी बसस्टॅाप जवळ मोठ्या प्रमाणात साचत असलेल्या कचऱ्याबाबत तातडीने उपाय योजना करुन हा कचरा प्रश्न तत्काळ सोडविण्यासंदर्भात प्रशासनाला सुचना केल्या. तसेच आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर रस्त्यावर पडलेले खड्डे बुझविणे, ड्रेनेज लाईनवरील तुटलेली-खचलेली झाकणे दुरुस्त करणे, परिसरातील सर्व पथदिवे चालु करणे, रस्त्यावर आलेल्या झाडांच्या फांद्या तोडणे, या समस्यांवर देखिल तातडीने उपाय योजना करण्याच्या सुचना यावेळी संबंधित खात्याच्या अधिकारी वर्गाला केल्या आहेत लवकरात लवकर या समस्या दूर होतील.
यावेळी राहुल कोकाटे, सचिन पाषाणकर, प्रणित सुतार, क्षेत्रिय अधिकारी दिपक दपकेकर तसेच सर्व विभागाचे कनिष्ट अभियंता, कर्मचारी वर्ग आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
More Stories
पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, बाणेर, बालेवाडी, सूस परिसरातील विविध विकास कामांचा भूमी पूजन सोहळा संपन्न..
महिला दिन विशेष : सोनाली प्रकाश पवार (‘रिद्धीमा ब्युटी सलोन’)
सोमेश्वरवाडी येथे नारी शक्तीवंदन आणि रॅली मध्ये महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..