May 9, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सोमेश्वरवाडी येथील साईनगर मधील समस्या सोडविण्यासाठी सहाय्यक आयुक्त यांना नागरिकांचे निवेदन..

सोमेश्वरवाडी :

सोमेश्वरवाडी येथील साईनगरच्या समस्या सोडविण्यासाठी स्थानिक रहिवाश्यांनी औंध क्षेत्रीय कार्यालयात भेट देऊन सहाय्यक आयुक्त गिरीश धापकेकर यांना निवेदन दिले.

 

साईनगर भागात अंतर्गत ड्रेनेज लाईनचे चेंबर नुकतेच बदलण्यात आले. परंतु हे काम व्यवस्थित न झाल्याने येथे अजूनही मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्यात धोका निर्माण होत असून लवकरात लवकर दुरुस्त करुण द्यावे अशी मागणी सोमेश्वरवाडी साईनगर येथिल नागरीकांच्या वतीने सहाय्यक आयुक्तांना निवेदन देऊन करण्यात आली.

यावेळी भरत जोरे, लक्ष्मी घोडके, सुवर्णा जोरे, सौ. वायाळ, सारिका जोरे, सौ. बिरदवडे, सौ. पाटील, सौ. दातार, सौ. बामगुडे उपस्थित होते.