May 11, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सोमेश्वरवाडी येथे सचिन दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन…

सोमेश्वरवाडी :

भाजपा कोथरुड विधानसभा उपाध्यक्ष सचिन चिंतामण दळवी यांच्या वाढदिसानिमित्त महा आरोग्य शिबीर, नि:शुल्क नेत्र तपासणी शिबीर, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर व मोफत चष्मे वाटप करण्याचे आयोजन सचिन दळवी मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रभाग क्र. १४, सोमेश्वरवाडी – पाषाण – सुतारवाडी – बावधन – संजय गांधी वसाहत – सुसरोड या प्रभागातील नागरिकांसाठी रविवार दि. १० सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत सचिन चिंतामण दळवी यांच्या जनसंपर्क कार्यालयात महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत मोफत अल्पदरात महा आरोग्य शिबीर राबविण्यात आले आहे. यामध्ये हृदय रोग, मणके विकार शस्त्रक्रिया, कॅन्सर शस्त्रक्रिया उपचार व तपासणी, मेंदुविकार शस्त्रक्रिया व मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच नि:शुल्क नेत्र तपासणी शिबीर, मोतीबिंदू लेन्स शस्त्रक्रिया शिबीर‌, तज्ञ डॉक्टरांच्या सल्याने लहान मुलांच्या बौधीक व शारिरीक विकासासाठी मोफत आयर्न व मल्टीविटामीन सिरप, महिलांसाठी व माता भगिनींसाठी २५ प्रकारच्या रक्त तपासण्या, बी.पी., शुगर, हिमोग्लोबीन इ. मोफत सल्ला व मार्गदर्शन आयोजीत करण्यात आले आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घालुन दिलेला आदर्श समोर ठेवून वाढदिवस नागरिकांची आरोग्य सेवा करत महाआरोग्य शिबीर आयोजित करून साजरा करत आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिरात सहभागी होवून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी : सचिन दळवी (कोथरूड विधानसभा उपाध्यक्ष)