December 3, 2024

Samrajya Ladha

सोमेश्वरवाडी, पाषाण, सुतारवाडी, बावधन परिसरातील नागरिकांना मिळणार ७०% सवलतीच्या दरात टीव्ही व वॉटर फिल्टर सचिन दळवी यांचा उपक्रम..

पाषाण :

भाजपा कोथरुड विधानसभा उपाध्यक्ष सचिन चिंतामण दळवी यांच्या वाढदिसानिमित्त ७०% सवलतीच्या दरात एलईडी टीव्ही व वाॅटर फिल्टर विक्री ५ सप्टेंबर २०२३ ते १५ सप्टेंबर २०२३ नागरिकांसाठी विशेष ऑफर चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे उद्घाटन शांताराम महाराज निम्हण यांच्या हस्ते करण्यात आले.

परिसरातील सर्वांसाठी रास्त दरात चांगल्या प्रकारचा टीव्ही व वाॅटर फिल्टर नागरीकांना मिळावा या हेतूने ७०% सवलतीच्या दरात या वस्तू उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा : सचिन दळवी (कोथरूड विधानसभा उपाध्यक्ष)

यावेळी राहुल कोकाटे, उत्तम आप्पा जाधव, ज्ञानेश्वर जाधव, विनायक काकडे अशोक दळवी, रोहन कोकाटे, विक्रम जाधव, संतोष सपकाळ, प्रविण आमले, बाळासाहेब सातपुते, उत्तम जाधव, निरज, राहुल उपस्थित होते.