November 21, 2024

Samrajya Ladha

सोमेश्वरवाडी येथील अभ्यासिका व उन्नती वर्गाला ज्येष्ठ उद्योगपती मा.श्री.सुभाषजी चुत्तर यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य भेट..

सोमेश्वरवाडी :

ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या हस्ते राष्ट्रपती पदक प्राप्त, ज्येष्ठ उद्योगपती मा.श्री.सुभाषजी चुत्तर यांचा 30 ऑगस्ट 2023 रोजी 80 वा वाढदिवस झाला. त्या निमित्त लोकविकास मंडळ संचलित अभ्यासिका व उन्नती वर्गाला सोमेश्वरवाडी पाषाण येथे शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले.

वाढदिवस हा सामाजिक उपक्रमाने साजरा व्हावा म्हणून मुलांना शैक्षणीक साहित्य वाटप करुण त्यांच्या चेहऱ्यावर आनंदी भाव पाहायला मिळाल्याने वाढदिवस खऱ्या अर्थाने सार्थकी लागल्याचे समाधान मिळाले : ज्येष्ठ उद्योगपती मा.श्री.सुभाषजी चुत्तर

यावेळी लोकविकास मंडळ संचलित अभ्यासिका व उन्नती वर्गामध्ये विठ्ठल-रुख्मिणी मंदिर सोमेश्वरवाडी पाषाण येथे भाषा विकास कीट, गणित पेटी, व्याकरण कीट, किशोरी विकास पुस्तक संच, बालवाचनालय कीट, मुलांना बसण्यासाठी चटई, बॅनर इत्यादी शैक्षणिक साहित्य स्वरूपात भेट देऊन वाढदिवसाचे हे आनंदी क्षण साजरे करण्यात आले. या शैक्षणिक साहित्यामुळे विद्यापीठ भागातील सात नगरातील एकूण 270 विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.

यावेळी ज्येष्ठ उद्योगपती सुभाष चुत्तर, जोस्नाताई चुत्तर, गिरीष कांदळगावकर, सुशील अग्रवाल, लताताई शहा, मानसीताई शहा, किशोर वैद्य, राजाभाऊ सुतार, महेंद्र रणपिसे, मधुकर दळवी, अजय चुत्तर, संतोष अरगडे, शामराव काकडे, जगन्नाथ दळवी, लोकविकास मंडळ समन्वयक टीम उपस्थित होते.