May 11, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

रोहन कोकाटे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत २५०० नागरिकांनी घेतला लाभ..

पाषाण :

पाषाण येथील भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस रोहन कोकाटे यांच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्री मा चंद्रकांतदादा पाटील यांचा मार्गदर्शना खाली ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचा शुभारंभ भाजपा प्रदेश सरचिटणीस माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

सरकारी सेवा आणि लाभ मिळविण्यात नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करून सर्वसामान्यांना विविध शासकीय योजनांचे लाभ मिळावेत त्याचबरोबर विविध महत्त्वाची कागदपत्रेसुद्धा सुलभतेने मिळावीत व नागरिकांची सेवा घडावी याउद्देशाने वाढदिवसानिमित्त ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबविण्यात आला होता : रोहन कोकाटे (भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस)

यावेळी नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. या उपक्रमांतर्गत उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र,अधार कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, संजय गांधी निराधार अनुदान योजना अशा विविध योजना तसेच कार्ड व दाखल्यांचे सुमारे २५०० नागरिकांना वाटप केले.

तसेच शासकीय योजनांच्या बाबतही सविस्तर माहिती घेवून योजनांचा लाभ सर्व लाभार्थ्यांना मिळावा या अनुषंगाने सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे रोहन कोकाटे यांनी सांगितले.

प्रसंगी कोथरूड विधानसभा अध्यक्ष पुनीत जोशी, नाईक तहसीलदार, आखाडे साहेब, मंडल आधिकारी सुर्यकांत पाटील, कोथरूड युवा मोर्चा अध्यक्ष दुष्यंत मोहोळ, भाजपा नेते राहुल कोकाटे, कोथरूड विधानसभा उपाध्यक्ष सचिन दळवी व सर्व पदधीकारी व परिसरातील नागरिक, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.