March 21, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सोमेश्वरवाडी येथे लहान मुलांसाठी संस्कार वर्गाचे आयोजन..

सोमेश्वरवाडी :

लोकविकास मंडळ संचलित बाल उन्नती प्रकल्प अंतर्गत आणि सचिन दळवी मित्र परिवाराच्या वतीने सोमेश्वरवाडी येथील लहान मुलांसाठी संस्कार वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.

मुलांच्या मनावरती चांगले संस्कार घडावे. चांगले विचारांची देवाण-घेवाण करत त्यांच्या बुद्धीला चालना मिळावी व त्यांच्यावर संस्कार घडावे या हेतूने दर आठवड्याला शनिवारी आणि रविवारी हा संस्कार वर्ग चालू केला असून त्यासाठी मुलांनी चांगला प्रतिसाद दिला व मोठया प्रमाणावर उपस्थित राहिले. पालकांनी जास्तीत जास्त मुलांना या संस्कार वर्गात सहभागी करून घ्यावे अशी मी विनंती करत आहे : सचिन दळवी (उपाध्यक्ष भाजपा कोथरूड विधानसभा)

यावेळी अरूण निमकर्डे लोकविकास मंडल, नरेंद्र कुलकर्णी, महेंद्र रणपिसे, मधुकर दळवी, संतोष आरगडे, विक्रम जाधव, राहुल शिंदे, गणेश पठारे, आणि ग्रामस्थ उपस्थित होते.