March 21, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

महेश सुतार यांच्या वतीने शिवसेना शाखा सुतारवाडी येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा..

सुतारवाडी :

सुतारवाडी पाषाण येथील शिवसेना शाखेमध्ये आज 15 ऑगस्ट दिनानिमित्त महेश भीमराव सुतार शिवदूत यांच्यामार्फत कार्यक्रमाचे आयोजन करून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.

आपला भारत देश स्वतंत्र होऊन आपण आज ७७ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब असून आपल्या राष्ट्रवादी अभिवादन करत हा स्वातंत्र्य दिन चिरायू होवो अशी सदिच्छा राहील. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा : शिवदूत महेश भीमराव सुतार

त्यानिमित्त बोपोडी महानगरपालिकेच्या मुख्याध्यापिका सुनीताताई भीमराव सुतार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपविभाग प्रमुख दिनेश नाथ, विभाग संघटिका स्वातीताई रणपिसे, शाखा संघटिका सुनीताताई रानवडे, शाखा संघटिका सुरेखा शेळके शालिनीताई पाडाळे रूपालीताई सुतार, अमोल फाले, सर्व पदाधिकारी तसेच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी नारायण l जाधव, राम चव्हाण, सुहास जाधव, सतीश रणवरे, साहेबराव मंजुळकर, प्रवीण सोनवणे, विनोद कांबळे, रामाभाऊ शिंपाळे, आप्पा गायकवाड, व मराठा महासंघाच्या महिला पदाधिकारी सौ छायाताई रणपिसे, सोनल सुतार, अश्विनी बलकवडे, पल्लवी शिंदे, तसेच राष्ट्रवादीच्या शहर महिला उपाध्यक्ष स्वातीताई मोरे, पाषाण गावातील सामाजिक कार्यकर्ते मधुकर निम्हण, सुतारवाडी गावातील सामाजिक कार्यकर्ते धर्मराज सुतार, सुदाम सुतार, मनोहर सुतार, मनीष चक्रनारायण, अनिल नलावडे, भीमराव सुतार, नकुल गोळे, गणेश मोरे, संदीप सुतार, श्रीकांत रणपिसे, विठ्ठल नाथ, संजय सुतार,दिनेश भाऊ गव्हाणे,अक्षय बा सुतार, विशाल मालपाटे, सनशाईन प्रीस्कूल मधील मुलांचे पालक तसेच महिला मंडळ यांनी उपस्थिती लावली.

यावेळी स्वातंत्र्यदिनानिमित्त सनशाइन प्री स्कूल येथे ध्वजारोहण करण्यात आले आणि स्कूल मधील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.