पुणे :
कार्यसम्राट आमदार विनायक निम्हण यांच्या जयंती निमित्त सोमेश्वर फाऊंडेशनच्या वतीने ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार ०६ ऑगस्ट २०२३ रोजी ‘विनामूल्य कार्यसम्राट महाआरोग्य शिबीर’ कृषी महाविद्यालय मैदान भोसले नगर, शिवजी नगर, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबीराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ९ वाजता होणार आहे.
या शिबीराबद्दल माहिती देताना माजी नगरसेवक सनी निम्हण म्हणाले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच महाराष्ट्र राज्याचे यांची ‘स्वस्थ ग्राम – स्वस्थ ही संकल्पना आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे ‘रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा’ हे ब्रीदवाक्य घेऊन गरजू व गरीब रुग्णांसाठी सेवा कार्य करण्याच्या हेतूने ‘कार्यसम्राट महाआरोग्य शिबिर’आयोजित केले आहे.
या शिबिराचा भाग म्हणून रुग्णांसाठी दिनांक 22 जुलै ते ०४ ऑगस्ट २०२३ पर्यंत रुग्णपुर्व तपासणी अभियानामध्ये शिवाजीनगर मतदारसंघात (शिवाजीनगर पासून सोमेश्वर वाडी सुतारवाडी बाणेर बालेवाडी व इतर परिसर) एकूण ५७९६३ रुग्णांची पूर्व तपासणी करण्यात आली. द्वितीय रुग्ण तपासणी अभियानात आवश्यक रक्त लघवी इसीजी एक्स-रे इत्यादी प्रकारची तपासणी मोफत करण्यात येत आहे.
यावेळी प्रमूख पाहुणे म्हणून केंद्रिय मंत्री नारायण राणे, पालक मंत्री चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार, रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे, शिवसेना उपनेते सचिन अहिर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
शिबीराचे वैशिषे –
विनामुल्य आरोग्य शिबीरात सर्व पॅथींचा समावेश.
अँलोपॅथी, आयुष (आयुर्वेद, होमिओपॅथी, योग, युनानी), दंतचिकीत्सा इत्यादी तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया व
औषधी विनामुल्य उपलब्ध
देशातील नामवंत तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती.
डॉ. वाकणकर, डॉ. गौतम भंसाळी, डॉ. रमाकांत देशपांडे, डॉ. के. एच संचेती, डॉ. विकास महात्मे डॉ. संचेती,
डॉ. यशराज पाटील, डॉ. ललवाणी, डॉ. चंदनवाले, डॉ. तांबे, डॉ. जगन्नाथ दिक्षीत, डॉ. अमित मायदेव, डॉ. अजय
चौरसिया इत्यादी
विविध आजारांवरील उपचार
एकुण ८० बाह्यरुग्ण कक्षांचा समावेश
सदरील बाह्यरुग्ण कक्षांत आयुष, नेत्रचिकीत्सा, दंतचिकीत्सा, कान नाक घसा, जनरल मेडीसीन, जनरल सर्जरी, हृदयरोग, श्वसनविकार, मुत्ररोग, प्लॉस्टिक सर्जरी, स्त्रीरोग, बालरोग, अस्थिव्यंगोपचारशास्त्र, अनुवशीक विकार, कर्करोग, लठ्ठपणा, वृध्द जनरल तपासणी, मतीमंद रुग्ण तपासणी, मनोविकार, मेंदुरोग इत्यादी आजारावर
विनामुल्य औषधोपचार व शस्त्रक्रिया त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या आवश्यक रक्त व लघवी चाचणी नमुणे संकलन, तसेच इ.सी.जी, मॅमोग्राफी, पी.एफ.टी., बी.एम.डी. तपासणी,
गरजु रुग्णांना मोफत वितरण :
कृत्रिम अवयव, चष्मे, वृध्दकाठी, अंधकाठी, दिव्यांग साहित्य, कर्णयंत्र, दातांच्या कवळया यांचे नोंदणीनुसार वाटप आपतकालीन व्यवस्थेमध्ये कार्डीयाक रुग्णवाहीका, रुग्णवाहीका, अग्निशमन वाहन, रुग्ण स्ट्रेचर, व्हिलचेअर यांचा समावेश
सर्व रुग्ण व रुग्णनातेवाईक यांना मोफत नास्ता व भोजनाची सोय.
सर्व नागरीकांनी या बहुमुल्य संधीचा लाभ घेण्याकरिता आरोग्य शिबिरात सहभागी व्हावे असे आयोजक सोमेश्वर फॉऊंडेशन, पुणे तसेच निमंत्रक माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी आवाहान केले आहे. रुग्णहिताय गरजू नागरिकांनी आधिक माहितीसाठी ८३०८१२३५५५ या नंबरवर संपर्क करावा किंवा www.sunnynimhan.com या वेबसाईटवर नोंदणी
करावी.
More Stories
पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, बाणेर, बालेवाडी, सूस परिसरातील विविध विकास कामांचा भूमी पूजन सोहळा संपन्न..
महिला दिन विशेष : सोनाली प्रकाश पवार (‘रिद्धीमा ब्युटी सलोन’)
सोमेश्वरवाडी येथे नारी शक्तीवंदन आणि रॅली मध्ये महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..