December 3, 2024

Samrajya Ladha

पाषाण गावची कन्या दिपाली निम्हण हिने सहाय्यक सरकारी अभियोक्ता गट अ (गृह विभाग) परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल कॉसमॉस बँक वतीने सन्मान..

पाषाण :

पाषाण गावातील पै. रघुनाथ राघोबा निम्हण यांची नात व श्री. सुरेश रघुनाथ निम्हण आणि सौ. जयश्री सुरेश निम्हण यांची कन्या कु. ॲड. दिपाली सुरेश निम्हण हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या सहाय्यक सरकारी अभियोक्ता गट अ (गृह विभाग) क्लास १ अधिकारी या परीक्षेत अपंग प्रवर्गात प्रथम क्रमांकाने मिळवून उत्तीर्ण झाल्याबद्दल कॉसमॉस बँक पाषाण गाव शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

कष्ट अभ्यास आणि जिद्द या जोरावर दिपाली निम्हण यांनी उल्लेखनीय कामगिरी करत यश संपादन करून पाषाण गावचे नाव उंचावले आहे. तिच्या या कामगिरीची दखल घेत पाषाण गाव कॉसमॉस बँक शाखेने तिचा सन्मान केला.

दिपालीचे सुरवातीचे प्राथमिक शिक्षण म न पा शाळेत, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मॉर्डन हाय स्कूल गणेशखिंड मध्ये झाले. लॉ चे शिक्षण मॉर्डन लॉ कॉलेजमध्ये करून पुणे विद्यापीठांमधून L L M चे शिक्षण प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केले. तसेच महाराष्ट्रात घेण्यात येणाऱ्या SET परीक्षेत लॉ विषयात SET उत्तीर्ण झाली आहे.

यावेळी माजी नगरसेवक प्रमोद अण्णा निम्हण, बँक मॅनेजर श्री पाद काढगावकर, सौ. एडके, श्री. सुरेश निम्हण, श्री. संदिप निम्हण, श्री. सुभाष निम्हण, श्री. गिरीश धडफळे, श्री. कपिल जाधव उपस्थित होते.