October 28, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सुस रोड येथील पाषाणकर दत्त मंदिरात दत्त जयंती उत्सव साजरा..

पाषाण :

सालाबादप्रमाणे याही वर्षी दत्त जयंती निमित्त सुस रोड येथील पाषाणकर दत्त मंदिरात दत्त जयंती निमित्त विविध कार्यक्रम कार्यक्रम संपन्न झाले.

सकाळी ७ वाजता श्री दत्त महाराजांचा अभिषेक, ८ वाजता होम हवन, दुपारी २ ते ४ गुरुदत्त महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर सायंकाळी ५ ते ६ श्री दत्त जन्माचे ह.भ. प. दत्तात्रय महाराज दहिभाते ह्यांचे प्रवचन, श्री दत्त जन्म पाळणा आणि महाआरती जल्लोषात संपन्न झाली. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली. त्यासाठी ४-५ हजार भाविकांनी उपस्थिती लावली.

ह्या दत्त जयंती कार्यक्रमाबरोबरच वर्षभर खालील उपक्रम देखील राबविले जातात. जसे की, प्रत्येक गुरुवारी व एकादशीला भजन, प्रत्येक पौर्णिमेला महाप्रसाद तसेच सर्व संतांच्या जयंती जल्लोषात साजरी करण्यात येतात.

 

You may have missed