बालेवाडी :
बालेवाडी, हाय स्ट्रीट मैदान येथे उत्तर भारतीय बांधवांच्या श्रद्धेचा आणि आस्थेचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छठ पूजा निमित्त एक भव्य कार्यक्रम पार पडला. या मंगल सोहळ्याचे आयोजन अमोल बालवडकर फाउंडेशन, नॉर्थ कम्युनिटी वेलफेअर सोसायटी आणि अरविंदकुमार सिंग यांच्या वतीने करण्यात आले होते.
या प्रसंगी उपस्थित भाविकांनी सूर्यदेवाची उपासना करत निसर्ग, कुटुंब आणि समाजाशी असलेले आपले नाते अधिक दृढ करण्याचा संदेश दिला. श्रद्धा, भक्ती आणि सामूहिक एकतेचा सुंदर मिलाफ या प्रसंगी पाहायला मिळाला. भगवान सूर्यदेवाला प्रातःकालीन अर्घ्य अर्पण करून चार दिवसांच्या छठ महापर्वाचा शुभ समारोप करण्यात आला. भाविकांनी “छठी मइया की जय” च्या गजरात पूजा पार पाडत, सुख, शांती आणि समृद्धीच्या प्रार्थना केल्या.
कार्यक्रमात अमोलभैय्या बालवडकर यांच्यासोबत पुणे शहराचे अतिरिक्त पोलिस आयुक्त यांच्या पत्नी सौ. किरणजी शर्मा, मा. नगरसेविका स्वप्नालीताई सायकर, मा. नगरसेविका संगिताताई तिवारी, श्री. प्रकाशतात्या बालवडकर, श्री. गणेशजी कळमकर, श्री. राहुलजी कोकाटे, सौ. उमोताई गाडगीळ, सौ. अस्मिताताई करंदीकर, सौ. प्राजक्ताताई देवस्थळी, तसेच नॉर्थ कम्युनिटी वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष अरविंदकुमार सिंग आणि सोसायटीचे सदस्य उपस्थित होते.
तसेच कोथरूड (उत्तर) विधानसभा मंडलातील पदाधिकारी, महिला सदस्य, कार्यकर्ते व उत्तर भारतीय बांधव सहपरिवार मोठ्या संख्येने सहभागी झाले.
या प्रसंगी अमोलभैय्या बालवडकर यांनी सर्व उत्तर भारतीय बांधवांना शुभेच्छा देत म्हटलं की, “छठ पूजा हा श्रद्धा, संयम आणि आस्थेचा सण आहे. सूर्यदेवाच्या उपासनेद्वारे आपण निसर्गाशी आपले नाते अधिक दृढ करतो. समाजात एकतेचा आणि भक्तीभावाचा हा संदेश कायम राहो.”
कार्यक्रमात विविध धार्मिक विधी, संगीत, आणि सामूहिक पूजनाच्या माध्यमातून भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. छठी मइया आणि सूर्यदेवाच्या कृपेने सर्वांच्या जीवनात प्रकाश, आनंद आणि समृद्धी नांदो, अशा शुभेच्छांसह कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.




More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी