बाणेर :
बाणेर मुळा नदी घाट येथे उत्तर भारतीय बांधवान सोबत छट महापर्व निमित्त सूर्य भगवानाला अर्घ्य अर्पण करत छटा पूजा करण्यात आली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डॉ. दिलीप मुरकुटे व प्रभाग क्रमांक 9, सुस बाणेर बालेवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी, महाळुंगे, सुतारवाडी मधील उत्तर भारतीय नागरिकांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मागील 17 वर्षापासून सातत्याने छटपूजेचे आयोजन करण्यात येत आहे.
डॉ. दिलीप मुरकुटे यांच्या वतीने घाटावरती छटपूजेसाठी व्यवस्था करण्यात आली होती. तसेच नाश्ता व पाणी व्यवस्था उत्तर भारतीय नागरिकांसाठी करण्यात आली होती.
यावेळी डॉ. दिलीप मुरकुटे, उत्तर भारतीय आघाडीचे अध्यक्ष प्रकाश वर्मा, राजेश वर्मा, प्रवीण कुमार सिंह, विद्यासागर सिंह, हरिश्चंद्र वर्मा, नजमा आलम, रणजीत राम, चंदन कुमार चौरसिया, सोनू राय, नंदनलाल राय दुर्गेश मुखिया, रमेश कुमार कनोजिया, जयकिशोर साह, जितेंद्र प्रजापती, सुभाष सहानी, काशिनाथ वर्मा, सुमित यादव, राम गायकवाड, एडवोकेट विशाल पवार, सोमनाथ कोळेकर, रखमाजी पाडाळे, जयेश मुरकुटे, मेहबूब शेख, सलीम सुतार, नितीन चांदेरे, ज्योती चांदेरे, एडवोकेट सुदाम मुरकुटे, शिवाजी चिव्हे आदी उपस्थित होते.
यावेळी बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सुस, महाळुंगे आदी परिसरातील ३००० पेक्षा जास्त उत्तर भारतीय नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी