बालेवाडी :
बालेवाडीतील साई चौक परिसरात 2023 मध्ये तब्बल 1 कोटी रुपये खर्चून बांधलेली भाजी मांडई आजही बंद अवस्थेत आहे. सार्वजनिक निधी वापरून उभारलेले हे काम वापरात न आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. जनतेच्या पैशातून उभारलेली भाजी मंडई सुरू का केली जात नाही. यासाठी जयेश मुरकुटे यांनी पुढाकार घेत नागरिकांच्या हक्कासाठी पुढे होऊन नागरिकांना सोबत घेऊन जनआंदोलन निर्णय घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार चे कोथरूड विधानसभा कार्याध्यक्ष जयेश संजय मुरकुटे यांनी “चला तर मग प्रश्न विचारुया” या घोषवाक्याखाली नागरिकांसह जनआंदोलन करणार आहेत. या आंदोलनाचे आयोजन 30 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 9:00 वाजता साई चौक, बालेवाडी येथे करण्यात आले आहे.
पोस्टरमधून जयेश मुरकुटे यांनी स्पष्ट संदेश दिला आहे —
“आपले 1 कोटी पाण्यात? कारण आपण विचारतच नाही!”
या जनआंदोलनाद्वारे स्थानिक प्रशासनाकडे या प्रकल्पाबाबत उत्तरदायित्वाची मागणी केली जाणार असून, नागरिकांना सक्रिय सहभागाचे आवाहन जयेश मुरकुटे यांच्या वतीने करण्यात आले आहे.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी