February 4, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर येथे दिवाळी फराळाच्या माध्यमातून विशाल गांधिले यांचे प्रभावी शक्ती प्रदर्शन!

बाणेर :

बाणेर परिसरात नागरिकांच्या एकत्रित सहभागातून एकता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा दिवाळी फराळ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. जनतेशी नाळ घट्ट ठेवण्याच्या उद्देशाने विशाल गांधिले यांच्या पुढाकाराने कुंदन गार्डन, बाणेर येथे आयोजित या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.

या सोहळ्याला ३,००० हून अधिक नागरिक उपस्थित राहिले. सुगम संगीताच्या कार्यक्रमाने वातावरण अधिक आनंदी, उत्सवी आणि भावनिक बनले.

या प्रसंगी आमदार शंकर मांडेकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर कार्यवाह सचिन भोसले, प. महाराष्ट्र प्रांत धनंजय काळे, विद्यापीठ भाग कार्यवाह मा. संजय वाघुळदे, सहकार्यवाह मा. सारंग वाबळे तसेच राजाभाऊ सुतार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

समाजभूषण शांताराम महाराज निम्हण, माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे, संतसेवक मारूती कोकाटे, हभप दिलीप रणपिसे, राहुल बालवडकर, माजी नगरसेवक सनी निम्हण, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, अशोक मुरकुटे, माजी नगरसेवक सुशील मेंगडे, माजी नगरसेवक प्रमोद निम्हण, गणेश वर्पे, नवनाथ जाधव, दिनेश माथवड, प्रकाश द. बालवडकर, पांडुरंग कळमकर, बालिंग ताम्हाणे, राजेश विधाते, राजेंद्र मुरकुटे, बाळासाहेब रानवडे, जवाहर ढोरे, बाळासाहेब अमराळे, सतिश बहीरट, सचिन मानवतकर, शांताराम पाडाळे पाटील, सोपानराव पाडाळे, सिद्धार्थ रणवरे, सचिन पाषाणकर, मोरेश्वर बालवडकर, सचिन दळवी, संतोष जगदाळे, रमेश ठोसर, लक्ष्मण सायकर, बबनराव चाकणकर, सुधाकर धनकुडे,अर्जुन शिंदे, अर्जुन ताम्हाणे, अर्जुन ननावरे, आनंदा कांबळे पाटील, सागर बालवडकर, जितेंद्र कोळेकर, अनिकेत मुरकुटे, प्रकाश कि. बालवडकर, शरद भोते, विशाल विधाते, वामन कोळेकर, बाळासाहेब पाडाळे, बाळासाहेब खैरे, निलेश पाडाळे, सुहास भोते, शिवम बालवडकर, रोहन कोकाटे, प्रकाश तापकीर, युवराज कोळेकर, पांडुरंग पाडाळे, पै. समीर कोळेकर, दत्ता कळमकर, राजेंद्र कळमकर, काळुराम गायकवाड, राजेंद्र पाडाळे पाटील, चंद्रकांत जाधव, सुभाष भोळ, अनिकेत चांदेरे, मयुर भांडे, कल्याणी टोकेकर, उमा गाडगीळ, वैशाली कमाजदार, वृषाली साठे, नितीन रणवरे, राकेश पाडाळे, विनायक चिव्हे, अजिंक्य निकाळजे, अंकुश पाडाळे, अभिजीत केदारी, जवाहर केदारी, झानेश्वर पारखे तसेच परीसरातील जेष्ठ नागरीक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, म्हाळुंगे, सुस आणि सोमेश्वरवाडी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सामाजिक सलोखा, आपुलकी आणि जनसंपर्काचा अनोखा संगम ठरलेला हा दिवाळी फराळ सोहळा आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विशाल गांधिले यांचे सशक्त जनसंपर्क आणि संघटनात्मक ताकद दाखवणारे प्रभावी शक्ती प्रदर्शन ठरले आहे.

“जनतेच्या प्रेमाचा आणि सहकार्याचा हा उत्सव होता” — असे भावना व्यक्त करत विशाल गांधिले यांनी उपस्थित सर्व नागरिकांचे आभार मानले.