बाणेर :
छटपूजेनिमित्त बाणेर घाट येथे मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी पुणे महानगरपालिकेचे मा. स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांच्या वतीने बाणेर घाट परिसरात नैसर्गिक पाण्याच्या स्त्रोतासोबतच कृत्रिम तलावांची निर्मिती करून देण्यात आली आहे.
याशिवाय संपूर्ण परिसराची स्वच्छता मोहिम राबवून घाट परिसर स्वच्छ व सुरक्षित करण्यात आला आहे. भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून प्रकाश व्यवस्था, सुरक्षा, वाहतूक आणि पिण्याच्या पाण्याची सोय देखील करण्यात आली आहे.
या उपक्रमामुळे बाणेर परिसरातील नागरिक आणि छटपूजेसाठी येणारे सर्व भाविक आनंदित असून चांदेरे परिवाराचे मनःपूर्वक आभार व्यक्त करत आहेत.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!