February 4, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर येथे ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग; पूनम विधाते यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम उत्साहात पार

बाणेर :

भोर–राजगड–मुळशी मतदारसंघातील लोकप्रिय आमदार मा. शंकरभाऊ मांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पूनम विधाते यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘होम मिनिस्टर’ या मनोरंजक स्पर्धेला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आनंद, हास्य आणि उत्साहाच्या वातावरणात झालेल्या या कार्यक्रमात महिला भगिनींनी आपले कलागुण, आत्मविश्वास आणि सर्जनशीलता यांचा सुंदर संगम सादर करत उपस्थितांचे मन जिंकले.

कार्यक्रमादरम्यान विविध आकर्षक बक्षिसांचे वितरण करण्यात आले. विजेत्यांच्या चेहऱ्यावर झळकणारा आनंद आणि सर्व सहभागींच्या जोशपूर्ण सहभागाने कार्यक्रमाचे यश अधोरेखित झाले.

स्पर्धेतील पहिल्या १० विजेत्या महिला पुढीलप्रमाणे –
१. ज्योती पांडुरंग शिंदे
२. ज्येत्सना दादाराव कांबळे
३. मनोरमा अविनाश नवगिरे
४. शिल्पा गणेश खुमकर
५. प्रीती युवराज ढगे
६. सुनीता वाट धन्नेवाड
७. राधा उत्तम बारहाते
८. गौरी आत्माराम जगदाळे
९. नीलम राजूबा चव्हाण
१०. रेवती अमोल आठवले

महिलांच्या सहभागाने आणि जोशपूर्ण वातावरणाने कार्यक्रमाला एक वेगळाच रंग चढला. अशा उपक्रमांमुळे महिला सक्षमीकरण, सामाजिक ऐक्य आणि सांघिकतेची भावना अधिक दृढ होत असल्याचे उपस्थित मान्यवरांनी नमूद केले.

या कार्यक्रमाला ‘प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का सरकटे आणि सोनाली पाटील’, माजी नगरसेवक प्रमोद अण्णा निम्हण, माजी नगरसेविका सुषमाताई निम्हण, मुळशी पंचायत समितीच्या माजी सभापती सारिकाताई मांडेकर, उद्योजिका आरती राव, भाजप नेते राहुल कोकाटे, विशाल गांधिले, पोलीस पाटील अनंत कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस नेते बालम तात्या सुतार, युवा नेते जयेश मुरकुटे, कोथरूड कार्याध्यक्ष नितीन सर कळमकर, ह.भ.प. निवृत्ती आता कोळेकर, विश्वास कळमकर, बाळासाहेब खैरे, शिवसेना नेत्या ज्योतीताई चांदरे, भाजप नेते प्रवीण शिंदे, भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष राहुल पारखे, भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंगेश मुरकुटे, युवा उद्योजक प्रशांत पारखे, युवा उद्योजक शैलेश कदम, पैलवान राजू बालवडकर, बाणेर नागरी पतसंस्थेचे माजी चेअरमन विजय विधाते, बाणेर नागरी पतसंस्थेचे माजी चेअरमन रामदास विधाते, भगवान विधाते, राजेश विधाते, तुकाराम विधाते, विठ्ठल विधाते, मधुकर विधाते, माणिक तात्या गांधिले, शेखर सायकर, प्रणव कळमकर, राष्ट्रवादी महिला काँग्रेस पुणे शहर चिटणीस राखीताई श्रीराव, युवा उद्योजक अंकुश पाडाळे, उपसरपंच अजिंक्य निकाळजे, निहाल सायकर आदी मान्यवर व विधाते कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन क्रांती नाना मळेगावकर यांनी करत वातावरण अधिक रंगतदार केले.

अशा सांस्कृतिक आणि प्रेरणादायी उपक्रमांमुळे समाजात उत्साह, एकोपा आणि सकारात्मकता निर्माण होत राहते, हेच या ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेचे खरे यश म्हणावे लागेल.