बालेवाडी :
चैतन्य गायक कट्टा आणि राहुलदादा सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळच्या उत्साही वातावरणात बालेवाडी येथील नागरिकांसाठी दिवाळी फराळ व सुगम संगीताचा मनमोहक कार्यक्रम पार पडला.
मराठी आणि हिंदी गाण्यांच्या सुरेल सादरीकरणाने संपूर्ण परिसर आनंदमय झाला. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत संगीत, मैत्री आणि संस्कृतीचा सुंदर संगम अनुभवला.
या निमित्ताने उपस्थितांनी स्वादिष्ट दिवाळी फराळाचा मनसोक्त आस्वाद घेतला. सर्व उपस्थित मान्यवर व नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानत पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल बालवडकर यांनी सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे, माजी नगरसेवक प्रमोद निम्हण आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहराध्यक्ष समीर चांदेरे, ज्योती राहुल बालवडकर, राखी श्रीराव, ह.भ.प. संजय बाप्पु बालवडकर, ह.भ.प. संतोष बालवडकर, ह.भ.प. रोहितनाना बालवडकर, ऍडव्होकेट माशाळकर सर, विशाल गांधीले, विजयजी मालू, हरिश्चंद्र दिवेकर, किशोर वैद्य, गिरीधर राठी, अर्जुनराव ननावरे, अर्जुन शिंदे, ह.भ.प. अरुण बालवडकर, औदुंबर जाधव, डॉ. शाम कुलकर्णी, संदीप भाऊ बालवडकर, प्रकाश तात्या बालवडकर, आनंदा कांबळे (पोलिस पाटील), गणपत आप्पा बालवडकर (मा. सरपंच), अंकुशराव बालवडकर (मा. सरपंच), मा. Excise आयुक्त मोहन वर्दे सर, जगदीप सैनी, बाळासाहेब बालवडकर, विदाळे मॅडम, प्रकाश तात्या दशरथ बालवडकर आदी मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संगीत, स्नेह आणि संस्कृतीचा संगम ठरलेला हा कार्यक्रम नागरिकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी