September 19, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर येथे आज महिलांच्या कलागुणांना वाव देणारा “होम मिनिस्टर” कार्यक्रम — सौ. पूनम विशाल विधाते यांच्या वाढदिवसानिमित्त उत्साहात आयोजन

बाणेर :

राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष पुणे शहर कार्याध्यक्ष/ वामा वूमन्स क्लब अध्यक्षा सौ. पूनम विशाल विधाते यांच्या वाढदिवसानिमित्त बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सुस, महाळुंगे येथील महिलांसाठी मनोरंजक व प्रेरणादायी कार्यक्रम “होम मिनिस्टर” चे आज आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम रविवार, दि. 26 ऑक्टोबर 2025 रोजी सायं. 5.00 वाजता सौ. पूनम विशाल विधाते यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर, यशवंत चौक, विधाते वस्ती, बाणेर, पुणे 45 येथे होणार आहे.

या कार्यक्रमाचा उद्देश महिलांना त्यांच्या कलागुणांना, आत्मविश्वासाला आणि व्यक्तिमत्वाला वाव देणे हा आहे. प्रत्येक सहभागी महिलेसाठी आकर्षक भेटवस्तूंची सोय असून, विशेष बक्षिसांमध्ये टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, विजेचा गॅस शेगडी, ओव्हन, कुलर, मिक्सर, पंखा, इस्त्री आणि मानाची पैठणी यांचा समावेश आहे. 70 भाग्यवान महिलांना पैठणीचे बक्षीस देण्यात येणार आहे.

या सोहळ्याला खासदार सौ. सुनेत्रावहिनी अजीतदादा पवार या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, रूपालीताई चाकणकर (प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस /अध्यक्ष महिला आयोग),श्री. शंकर भाऊ मांडेकर (आमदार), श्री. सुनील अण्णा शेळके (आमदार, मावळ), श्री. सुभाष जगताप (अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पुणे शहर), आदी मान्यवर यांची उपस्थिती राहणार आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रांती (नाना) मळेगावकर करतील.

या कार्यक्रमाचे निमंत्रक वामा वूमन्स क्लब, पुणे असून, संपर्कासाठी क्रमांक 96074 54500 देण्यात आला आहे.

 

You may have missed