बाणेर :
महाळुंगे परिसरातील सामाजिक कार्यात सातत्याने पुढाकार घेणारे कार्यकर्ते विनायक शिवाजी चिव्हे, सौ. प्रियांका विनायक चिव्हे, प्रकाश तापकीर, तुषार सुदाम पाडाळे, राज गोविंद निकाळजे, आदित्य रोहिदास बामगुडे, तुषार हागवणे, हर्षल चिव्हे, स्वप्नील जाधव आणि कौस्तुभ फडणवीस यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
गेल्या अनेक वर्षांपासून समाजकार्यात सक्रिय असलेल्या या कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे भाजपला बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी आणि महाळुंगे परिसरात नव्या बळाचा आणि जनाधाराचा हातभार मिळणार आहे.
हा प्रवेश सोहळा केंद्रीय राज्यमंत्री मा. श्री. मुरलीधर अण्णा मोहोळ आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री, कोथरूड विधानसभा आमदार मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमात नव्या कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.
कार्यकर्त्यांच्या या प्रवेशामुळे पक्षात नवा उत्साह निर्माण झाला असून, प्रकाश तापकीर यांची उपाध्यक्ष आणि विनायक शिवाजी चिव्हे यांची चिटणीस, कोथरूड उत्तर मंडल म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली.
विनायक चिव्हे हे महाळुंगे गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असून, प्रकाश तापकीर यांनी बाणेर परिसरात सामाजिक कार्याची मजबूत पायाभरणी केली आहे. त्यांच्या अनुभव, स्थानिक प्रश्नांवरील ठाम भूमिका आणि नागरिकांशी असलेल्या घट्ट नात्यामुळे पक्षाच्या संघटनात्मक कार्याला नवी ऊर्जा मिळणार आहे.
भाजप कोथरूड उत्तर मंडलाचे अध्यक्ष लहू गजानन बालवडकर यांच्या नेतृत्वाखाली युवकांना संघटनाशी जोडण्याच्या दिशेने हा पक्षप्रवेश एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.
या प्रसंगी शहराध्यक्ष धीरजजी घाटे, आमदार भिमराव तापकीर, भाजप नेते गणेश बिडकर, युवा मोर्चा अध्यक्ष दुष्यंत मोहोळ, महिला मोर्चा अध्यक्ष मनीषा लडकत, सरचिटणीस पुनीत दादा जोशी, प्रकाश तात्या बालवडकर, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, राहुल कोकाटे, शिवम बालवडकर, सचिन पाषाणकर, सचिन दळवी, अनिकेत चांदेरे, काळुराम गायकवाड, मंदार रारावीकर, रोहन कोकाटे, राकेश पाडाळे, जागृतीताई विचारे, लक्ष्मण पाडाळे (पाटील), युवराज कोळेकर (मा. उपसरपंच), पांडुरंग पाडाळे (मा. उपसरपंच), पै. समीर कोळेकर, विवेक खैरे (मा. उपसरपंच), बबलू चिव्हे, अशिष खैरे, सागर चिव्हे, गणेश पाडाळे (पाटील) यांच्यासह मोठ्या संख्येने महिला आणि नागरिक उपस्थित होते.
या प्रवेशामुळे महाळुंगे आणि आसपासच्या परिसरातील भाजप संघटनेत नव्या ऊर्जेचा संचार झाला असून, पक्षाच्या तळागाळातील कार्यात गती येईल, असा विश्वास उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.


More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!