February 4, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर–म्हाळुंगे येथील कार्यकर्त्यांचा शिवम बालवडकर यांच्या पुढाकाराने भाजपा प्रवेश — खासदार मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रवेश सोहळा पार..

पुणे :

भारतीय जनता पार्टी पुणे शहर कार्यालयात आज झालेल्या विशेष कार्यक्रमात बाणेर व म्हाळुंगे येथील शिवम बालवडकर यांच्या पुढाकाराने अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. प्रवेश केलेल्या कार्यकर्त्याना कोथरूड विधानसभा उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर यांच्या हस्ते नियुक्ती देण्यात आली.

या प्रवेश सोहळ्यात खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर (आण्णा) मोहोळ तसेच महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते नव्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश संपन्न झाला.

भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये विनायक शिवाजी चिव्हे, प्रकाश तापकीर, प्रियांका विनायक चिव्हे, तुषार सुदाम पाडाळे, राज गोविंद निकाळजे, आदित्य रोहिदास बामगुडे, तुषार हागवणे, हर्षल चिव्हे, स्वप्नील जाधव आणि कौस्तुभ फडणवीस यांचा समावेश आहे.

या नव्या सदस्यांच्या प्रवेशानंतर सुस–म्हाळुंगे परिसरातील पक्षवाढ अधिक वेगाने होईल, असा विश्वास शिवम बालवडकर यांनी व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, “भाजपची विचारसरणी आणि विकासाची दिशा लक्षात घेऊन आम्ही सर्वजण पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी कटिबद्ध आहोत.”

या प्रसंगी भाजपा शहराध्यक्ष धीरजभाऊ घाटे, सभागृह नेते गणेश बिडकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष दुष्यंत मोहोळ, शहर सरचिटणीस राघवेंद्र (बाप्पू) मानकर, पुनीत जोशी, मंडल अध्यक्ष लहू (आण्णा) बालवडकर, राहुल कोकाटे, प्रल्हाद सायकर, प्रकाशतात्या बालवडकर, सचिन पाषाणकर, सचिन दळवी, रोहन कोकाटे आणि राकेश पाडाळे उपस्थित होते.

या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आणि उत्साही वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.