बाणेर :
कोथरूड मतदारसंघातील नागरिकांच्या विविध शासकीय प्रश्न, तक्रारी आणि मागण्यांचे त्वरित निराकरण व्हावे यासाठी खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने रविवारी, दिनांक 26 ऑक्टोबर 2025 रोजी, माऊली गार्डन, बाणेर येथे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत “जनता दरबार” आयोजित करण्यात आला आहे.
या जनतेशी थेट संवाद साधणाऱ्या उपक्रमात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, आमदार मा. चंद्रकांतदादा पाटील हे पूर्णवेळ उपस्थित राहणार असून, नागरिकांनी मांडलेल्या विषयांवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी विविध शासकीय खात्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या दरबारात नागरी सुविधा केंद्र, तलाठी विभाग, समाजकल्याण योजना, पंतप्रधान आयुष्यमान भारत योजना, महात्मा फुले वैद्यकीय योजना, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, पंतप्रधान आवास योजना, मुद्रा व विश्वकर्मा योजना, रेशनिंग कार्ड विभाग, पोलिस विभाग, पीएम सूर्यघर योजना, लाईट हाऊस, पोस्ट ऑफिस योजना, सहकार विभाग, एमएनजीएल तसेच नोकरीविषयक सल्ला विभाग अशा एकूण 19 विभागांचे प्रतिनिधी नागरिकांच्या अडचणी ऐकून तातडीने निराकरण करतील.
नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, आपल्या विषयासंबंधित कागदपत्रांसह उपस्थित राहावे. तसेच आपला प्रश्न किंवा तक्रार आधीच नोंदवण्यासाठी संबंधित लिंक किंवा QR कोड स्कॅन करून फॉर्म भरावा. टोकन मिळाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट सोबत ठेवून मेळाव्याच्या ठिकाणी दाखवावा. तसेच आपल्या विषयाचे थोडक्यात वर्णन एका कागदावर लिहून आणणे सोयीचे ठरेल.
या उपक्रमाचा उद्देश म्हणजे “जनतेच्या दारात प्रशासन” हा संकल्प प्रत्यक्षात उतरवणे. नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत त्वरित निर्णय देणे हीच या जनता दरबाराची खासियत आहे, असे आयोजकांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे नियोजन लहू बालवडकर, अध्यक्ष – कोथरूड विधानसभा (उत्तर मंडल) व स्थानिक नेते,पदाधिकारी यांच्या माध्यमातुन करण्यात आले असून, त्यांनी सर्व नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.


More Stories
बालेवाडीत कचरा समस्येवर मोरेश्वर बालवडकर यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन; १५ दिवसांत उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा
नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीचा मेणबत्ती मोर्चा
गायनातून भाव व्यक्त होणे अत्यावश्यक : पं. उपेंद्र भट सोमेश्वर फाउंडेशनतर्फे २४ व्या ‘पुणे आयडॉल- 2026’ स्पर्धेचे उद्घाटन