बाणेर :
दिवाळीच्या आनंदमयी वातावरणात बाणेर येथे माजी नगरसेविका ज्योती गणेश कळमकर व गणेश कळमकर यांच्या माध्यमातून “दिवाळी पहाट” या सुरेल कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात महाराष्ट्राची लाडकी गायिका कु. आर्या आंबेकर यांनी अनेक सुरेल गाणी सादर करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांच्या सुरेल आवाजाने परिसरात दिवाळीचा उत्साह अधिकच उजळून निघाला.
कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. या प्रसंगी माजी नगरसेवक श्री. ज्ञानेश्वर तापकीर यांनी उपस्थित श्रोत्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच माजी नगरसेविका ज्योती कळमकर यांच्या वडिलांचे नुकतेच निधन झाल्यामुळे उपस्थित सर्वांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. स्वतःवर आलेले दुःख बाजूला ठेवून, नागरिकांच्या आनंदासाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याचे गणेश कळमकर यांनी सांगितले.
या कार्यक्रमास भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडलचे सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे वातावरण भक्तिमय व उत्साही बनवणाऱ्या या “दिवाळी पहाट” चे सर्वत्र कौतुक होत आहे.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी