पाषाण :
कृष्णगंगा सोशल फाउंडेशन आणि भाजपचे रोहन रोहिदास कोकाटे व ऐश्वर्या रोहन कोकाटे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “दिवाळी संध्या व फराळ – भक्ती-शक्ती संगम” हा सांस्कृतिक सोहळा भक्ती, संगीत आणि शौर्याची अप्रतिम मैफल ठरला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ‘फत्तेशिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज’ या लोकप्रिय चित्रपटांतील गाजलेल्या गीतांचे गायक व अभिनेता अवधूत गांधी यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या सादरीकरणाने पाषाण–सुतारवाडी–सोमेश्वरवाडी–बाणेर–बालेवाडी-सुस-महाळुंगे परिसरातील शेकडो रसिकांची मने जिंकली.
कार्यक्रमादरम्यान वारकरी संप्रदायातील विणेकरी बबन नाना ववले यांचा शताब्दी निमित्त चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच वारकरी परंपरेत अनेक वर्ष सेवा करणाऱ्या संतसेवकांना ‘वारकरी सेवा सन्मान पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
या पुरस्काराने सन्मानित झालेल्यांमध्ये ह.भ.प. राजेंद्र महाराज दहिभाते, बन्सी अण्णा मुरकुटे, जगन्नाथ अण्णा जाधव, कृष्णाजी भोते, बारीकराव जोरे, निवृत्ती कोळेकर, सुरेश पाडाळे, उद्धवजी गोळे, दिलीप सातव, अशोक पाडळे, बाळासाहेब सुतार, गहिनीनाथ कळमकर, दिलीप रणपिसे, संजय बापू बालवडकर आदींचा समावेश होता.
या सन्मान सोहळ्यात पंढरीनाथ कोकाटे, शांताराम पाडाळे, नंदकुमार कोकाटे, पोपटराव जाधव, दत्ता अण्णा कोकाटे, आबासाहेब सुतार, गोविंद तात्या कोकाटे, रामभाऊ ववले, कालिदास कोकाटे, गुलाब दगडे, राजू ओझा, सुरेश अण्णा कोकाटे, बबन भेगडे, संजय कोकाटे, रोहिदास कोकाटे, ज्ञानेश्वर भेगडे, रामभाऊ सातपुते, ज्ञानेश्वर वळे, कैलास कोकाटे, संदीप कोकाटे, सुरेश डी. कोकाटे, भास्कर कोकाटे, रामचंद्र आमले, पांडुरंग कोकाटे, भूषण कोकाटे, मिलिंद भाऊ कोकाटे, शिवाजी दादा कोकाटे, विश्वास कळमकर या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमास आमदार शंकर भाऊ मांडेकर, चित्रपट दिग्दर्शक दिगपाल लांजेकर, समाजभूषण शांताराम महाराज निम्हण, मृदुंगमणी पांडुरंग (आप्पा) दातार, संत सेवक मारुती महाराज कोकाटे, राष्ट्रपती पुरस्कार विजेते रवींद्र घाटे, पोलीस निरीक्षक सुरेश मगदूम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या दिवाळी संध्येला भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष दुष्यंत मोहोळ, भाजप नेते गणेश कळमकर, सचिन पाषाणकर, राहुल कोकाटे, सचिन दळवी, शिवम सुतार, मोरेश्वर बालवडकर, शिवम बालवडकर, अनिकेत चांदरे, सुशील सरकाटे, अस्मिता करंदीकर, उमा गाडगीळ, प्रियंका बालवडकर, कल्याणी टोकेकर, मीना पारेगावकर, जागृती विचारे, रीना रायकर, स्मृती जैन आदींची उपस्थिती लाभली.
‘भक्ती आणि शौर्याचा संगम’ ठरलेल्या या दिवाळी संध्येला परिसरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने प्रतिसाद देत, पारंपरिक वारकरी भावनेसोबत संगीत आणि संस्कृतीचा अविस्मरणीय अनुभव घेतला.



More Stories
बालेवाडीत कचरा समस्येवर मोरेश्वर बालवडकर यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन; १५ दिवसांत उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा
नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीचा मेणबत्ती मोर्चा
गायनातून भाव व्यक्त होणे अत्यावश्यक : पं. उपेंद्र भट सोमेश्वर फाउंडेशनतर्फे २४ व्या ‘पुणे आयडॉल- 2026’ स्पर्धेचे उद्घाटन