बाणेर :
बाणेर, बालेवाडी, सुस, महाळुंगे, पाषाण, सुतारवाडी आणि सोमेश्वरवाडी परिसरातील नागरिकांसाठी लहू बालवडकर सोशल वेलफेअर तर्फे सलग पाचव्या वर्षी “सुरसंध्या” या दिवाळी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान मा. कॅबिनेट मंत्री आणि कोथरूड विधानसभेचे लोकप्रिय आमदार श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
गेल्या पाच वर्षांत दिवाळी मध्ये ‘सूर संध्या’ या संगीतमय सोहळ्यात शास्त्रीय गायक राहुल देशपांडे, राष्ट्रीय पुरस्कार विजेते कलाकार महेश काळे, प्रसिद्ध गायिका आर्या आंबेकर, प्रसिद्ध गायक,लेखक, संगीतकार सलील कुलकर्णी गतवर्षी द फोख अख्यान आणि अभंग रि पोष्ट असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावर्षी प्रसिद्ध गायिका मुग्धा वैशंपायन/लगाटे, प्रसिद्ध गायक प्रथमेश लगाटे आणि सुप्रसिद्ध निवेदक संकर्षण कऱ्हाडे यांची शास्त्रीय, सुगम व भावगीतांची सायंकालीन मैफिल सजली होती.
“सुरसंध्या” या दिवाळी विशेष कार्यक्रमामध्ये गेली पाच वर्षात दोनशे च्या आसपास समाजसेवा, न्याय आणि योग क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या तसेच पडद्यामागे राहून कार्यरत असलेल्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी देखील अशाच वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यंदाच्या वर्षी सन्मानित व्यक्ती :
श्री. रामदास बाबुराव ठोसर – योग गुरु
श्री. एम. एन. पातळे – निवृत्त न्यायाधीश
श्री. देविदास गुरुनाथ उंबरगे – सामाजिक क्षेत्र
श्री. पी. आर. देशमुख – निवृत्त न्यायाधीश
श्री. शिवलिंग बाबुराव जमखंडे – योग प्रशिक्षक
श्री. रामदास दातार – पत्रकारिता क्षेत्र
श्री. शिवकुमार पांडे – धार्मिक कार्य
श्री. किशोर वैद्य – सामाजिक कार्य
कु. आरव पटवर्धन – क्रीडा क्षेत्र
वीरपत्नी श्रीमती जयश्री सोपान पाडाळे,
श्री. बबनराव दामोदर पायगुडे (प्रगतशील शेतकरी),
कु. मीरा प्रियंका मधवापती (क्रीडाक्षेत्र) आणि
श्री. दीपक दत्तोबा लोळे (सामाजिक कार्य)
यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान आयोजक कोथरूड विधानसभा उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर म्हणाले, “समाजासाठी मनापासून काम करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देणं आणि त्यांच्या प्रयत्नांचा गौरव करणं, हाच आमच्या संस्थेचा हेतू आहे. या सन्मानातून समाजातील कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळते आणि त्यांच्या योगदानाला खरी दाद मिळते.” बाणेर बालेवाडी सुस महाळुंगे पाषाण सोमेश्वरवाडी आणि सुतारवाडी परिसरातील नागरिकांसाठी माझ्याकडून समाज हिताचे कार्य नेहमीच घडत राहो अशी सदिच्छा व्यक्त करतो.
कार्यक्रमाच्या शेवटी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी लहू बालवडकर आणि त्यांच्या टीमचे कौतुक करत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, “समाजकार्याचा हा उत्सव म्हणजे एक प्रेरणादायी उपक्रम आहे. समाजातील प्रत्येक कार्यकर्त्याला अशा सन्मानाने प्रोत्साहन मिळालं पाहिजे.”
हा दिवाळी विशेष “सुरसंध्या” कार्यक्रम उत्साह, संगीत आणि सामाजिक एकतेच्या वातावरणात संपन्न झाला. परिसरातील नागरिकांनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून लहू बालवडकर सोशल वेलफेअरच्या उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर, भाजपा नेते गणेश कळमकर, प्रकाश बालवडकर, यांच्यासह भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडल सरचिटणीस, उपाध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी, भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडल मधील सर्व आघाड्यांचे पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



More Stories
“उच्च तंत्र की तंत्रमंत्र? अमोल बालवडकरांचा भोंदू खरात सोबत फोटो वरून चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा”
औंध ग्रामदैवत भैरवनाथ महाराज उत्सव ३ मे रोजी; ग्रामसभेत तारीख जाहीर
लहानग्यांच्या स्वप्नांना मिळाले पंख: पेरिविंकल पिरंगुटमध्ये सीनियर केजी ग्रॅज्युएशन डे जल्लोषात साजरा!!!