बाणेर :
दरवर्षीप्रमाणे यंदाही जीवन चाकणकर सोशल वेल्फेअर फाउंडेशन आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, बाणेर-बालेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता कामगारांना दिवाळीच्या शुभेच्छा देत मिठाई वाटपाचा उपक्रम हर्षोल्हासात पार पडला.
या उपक्रमात प्रमुख उपस्थिती भाऊसाहेब चाकणकर, प्रशांत कळमकर, नितीन आल्हाट, महादेव चाकणकर, महेंद्र गंगावणे तसेच इतर पदाधिकारी व मान्यवरांची होती.
आपला परिसर स्वच्छ ठेवत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या स्वच्छता कामगारांची दिवाळी गोड व्हावी या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला. युवा नेते जीवन चाकणकर यांनी स्वच्छता कामगारांच्या मेहनतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, “समाजाच्या प्रत्येक स्तरातील लोकांची दिवाळी आनंददायी व्हावी, हा या उपक्रमामागचा हेतू आहे,” असे सांगितले.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित स्वच्छता कामगारांनी या आपुलकीच्या उपक्रमाबद्दल आनंद व समाधान व्यक्त केले. दिवाळीच्या या गोड भेटीमुळे समाजातील ऐक्य आणि आपुलकीचा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी