बाणेर :
माहेश्वरी समाजातील सिनिअर सिटिझन्स मंडळ MPF Silver Liners तर्फे दिवाळी मिलनाच्या निमित्ताने “महाराष्ट्राचे संत दर्शन” हा अद्वितीय सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. भक्ती, संगीत, नृत्य आणि नाट्यरूप सादरीकरणाने सजलेल्या या कार्यक्रमाने उपस्थित प्रेक्षकांना आध्यात्मिक आणि सांस्कृतिक प्रवासाचा आनंद दिला.
कार्यक्रमात श्री विठ्ठल-रुक्मिणी तसेच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताबाई, संतशिरोमणी नरहरी सोनार, जनाबाई, गाडगेबाबा, मीराबाई, कबीर, वासुदेव आणि बहिणाबाई यांच्या जीवनावर आधारित सादरीकरणाने प्रेक्षकांना संतपरंपरेची झलक अनुभवायला मिळाली.
संतांच्या अभंगांवर आधारित भारूड, गवळण, विठ्ठल नृत्य आणि पालखी-दिंडी सोहळा सादर करताना सभागृह “विठ्ठल नामाच्या गजरात” दुमदुमून गेले. पारंपरिक वेशभूषा, टाळ-मृदुंगाचे ताल, फुगडी आणि भक्तीगीतांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या संतसंस्कृतीचा उज्ज्वल आविष्कार रंगला.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अशोक लड्डा, सुरेश भैय्या, अशोक नवाल, नंदकिशोर काबरा, डॉ. श्याम चांडक, नवलकिशोर बंग आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी अध्यक्ष श्री सुरेशजी भैय्या, सचिव सौ. कल्पना मालू, संचालिका सौ. प्रतिभा बिर्ला आणि चेअरपर्सन सौ. चित्रा नवाल यांनी परिश्रम घेतले. त्यांच्या संयोजनामुळे “महाराष्ट्राचे संत दर्शन” हा कार्यक्रम केवळ दिवाळी मिलन नव्हे, तर भक्तीचा उत्सव ठरला.



More Stories
“उच्च तंत्र की तंत्रमंत्र? अमोल बालवडकरांचा भोंदू खरात सोबत फोटो वरून चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा”
औंध ग्रामदैवत भैरवनाथ महाराज उत्सव ३ मे रोजी; ग्रामसभेत तारीख जाहीर
लहानग्यांच्या स्वप्नांना मिळाले पंख: पेरिविंकल पिरंगुटमध्ये सीनियर केजी ग्रॅज्युएशन डे जल्लोषात साजरा!!!