पाषाण :
पाषाण परिसरातील सांस्कृतिक वातावरण अधिकच उजळून निघाले, जेव्हा सचिन दळवी सोशल फाउंडेशन तर्फे आयोजित “दीपोत्सवाची दिवाळी सांज संध्या” या सुरेल कार्यक्रमाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
संगीत, संस्कृती आणि दिवाळीचा उत्साह यांचा सुंदर संगम असलेल्या या कार्यक्रमात नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहून अविस्मरणीय संगीतमय सायंकाळ अनुभवली.
सुप्रसिद्ध गायिका आनंदी जोशी, सुर नवा ध्यास नवा फेम अक्षया अय्यर आणि पार्श्वगायक रवींद्र खोमणे यांच्या मधुर गायनाने कार्यक्रमाला रंगत आली. भक्तीगीत, शास्त्रीय रचना, सुगम आणि भावगीतांच्या सादरीकरणातून दिवाळीचा सोहळा भावनिक आणि सुरेल वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमास मा. ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीने कार्यक्रमाला गौरवशाली स्वरूप प्राप्त झाले. तसेच संतपरंपरेचे मार्गदर्शक ह.भ.प. डॉ. श्री. भावार्थ देखणे महाराज, प्रमुख – संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २०२५ आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी यांचे विश्वस्त यांच्या प्रेरणेने हा दिवाळी उत्सव अधिक मंगलमय झाला.
या सोहळ्याच्या आयोजनात विश्वासजी कळमकर यांचे सहकार्य लाभले.
नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग, कलाकारांचे मंत्रमुग्ध करणारे सादरीकरण आणि संस्कृतीशी जोडणारा हा दीपोत्सव, सर्वांच्या मनात कायमचा ठसा उमटवून गेला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोथरूड विधानसभा उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर, प्रकाश तात्या बालवडकर, माजी नगरसेविका स्वप्नाली ताई सायकर, सचिन पाषाणकर, प्रल्हाद सायकर, राहुल कोकाटे, मोरेश्वर बालवडकर, शिवम सुतार, रोहन कोकाटे, अनिकेत चांदेरे, सुहास भोते, विवेक मेहता, नवनाथ ववले, राकेश पाडळे, सुभाष भोळे, प्रमोद कांबळे, सचिन सुतार, वैदही बापट, उमा ताई गाडगीळ, अस्मिता करंदीकर, कल्याणी टोकेकर, वैशाली कामजदार, सुजाता धनकुडे, मृणाल गायकवाड, स्नेहल सुतार, उज्वला साबळे, वंदना सिंग, प्रियांका पेंडसे, मीनाताई पारगावकर, मानसी कांबळे, तसेच सोमेश्वर देवस्थान अध्यक्ष पोपटराव जाधव, संत सेवक मारुतीराव कोकाटे, बारीकराव जोरे, विठ्ठल अण्णा सुतार, नामदेव भेगडे, रोहिदास घोलप, जगन्नाथ दळवी, नितीन निम्हण, सुनील खुळे, नितीन चांदेरे, दिलीप सुतार, दीपक जाधव, शंकर घोलप, चंद्रकांत जाधव, रविभाऊ जोरे, शिवाजी कोकाटे, संतोष आरगडे, संतोष सपकाळ, तसेच पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे परिसरातील ग्रामस्थ व भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांच्या वतीने सर्व उपस्थित मान्यवर, नागरिक आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानून सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.



More Stories
योगीराज पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप….
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, सूस येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा भावस्पर्शी निरोपसमारंभ सोहळा संपन्न.
“शिक्षणाबरोबरच मूल्यसंस्कार घडले तरच विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होते” – मा. आमदार शरद ढमाले