June 4, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सोमेश्वरवाडी येथे आयोध्या वरून आलेल्या मंगल अक्षता कलशाचे टाळ मृदंगाच्या गजर करत स्वागत..

सोमेश्वरवाडी :

आयोध्या वरून आलेल्या मंगल अक्षता कलशाचे भव्य स्वागत सोमेश्वरवाडी येथे सकल हिंदू समाज आणि सोमेश्वरवाडी ग्रामस्थ यांच्या वतीने टाळ मृदंगाच्या निनादात आणि श्रीरामाच्या जयघोषात भव्य मिरवणूक काढून करण्यात आले. नागरिकांना ठीकठिकाणी फुलांचा वर्षाव देखिल करत मंगल अक्षता कलशाचे स्वागत केले. महिलांनी फुगड्याचे फेरे घेत आनंद साजरा केला.

दत्त मंदिर शिवरंजन टॉवर्स येथून मिरवणूक सुरूवात करण्यात आली आणि सोमेश्वर मंदिर जवळील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ आरती करण्यात आली.

या कार्यक्रमाचे आयोजन श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट, श्री विठ्ठल सेवा मंडळ, श्री विठ्ठल सेवा गणेश उत्सव मंडळ, सकल हिंदू समाज आणि सोमेश्वरवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते.