December 3, 2024

Samrajya Ladha

पाषाण येथिल श्री वाकेश्वर जेष्ठ नागरिक संघास मिळाला “कै.बी.जी.देशमुख उत्कृष्ट संघ पुरस्कार 2023 “

पाषाण :

पाषाण- बाणेर परिसरातील ज्येष्ठांसाठी कार्य करणाऱ्या व रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असलेल्या श्री वाकेश्वर जेष्ठ नागरिक संघ पाषाण या संस्थेस, आंतरराष्ट्रीय दीर्घायुकेंद्र भारत या संस्थेतर्फे “कै.बी.जी.देशमुख उत्कृष्ट संघ पुरस्कार 2023 ” संघास प्राप्त झालेला आहे. सदर पुरस्काराचे स्वरूप, रुपये दहा हजार धनादेश,चषक व सन्मानपत्र असे आहे. सदर पुरस्कार दिनांक 16 डिसेंबर 2023 रोजी नवीन विधी महाविद्यालय भारती विद्यापीठ सभागृह, पौड रोड पुणे या ठिकाणी आय एल सी संस्थेचे अध्यक्ष माननीय पद्मभूषण व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथजी माशलेकर व संस्थेचे चेअरमन तथा महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक ,माननीय जयंत उमराणीकर. तसेच ,भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम यांच्या शुभहस्ते संघास प्रदान करण्यात आला.

या पुरस्काराबद्दल संघाचे विद्यमान अध्यक्ष रघुनाथ उत्पात व संघ कार्यकारिणीचे सर्व सदस्य यांनी,संबंधित संस्थेचे आभार व्यक्त केले आहेत. तसेच हा पुरस्कार संघाच्या 25 वर्षातील वाटचाल कालावधीतील सर्व आजी/माजी पदाधिकारी व सभासद यांच्या उत्कृष्ट सहकार्याचा विश्वासाचा व सन्मानाचा आहे असे मत व्यक्त केले. तसेच संघाच्या रौप्य महोत्सवी वर्ष कार्यासाठी कार्यक्षेत्रातील सर्व सामाजिक व राजकीय तसेच या संघावर प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांनी आर्थिक मानसिक व शारीरिक सहकार्य करावे असे आवाहन केले.