April 25, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सन्मती बाल निकेतन संस्थेतील मुलांसोबत उज्जीवन बँकेच्या कर्मचाऱ्यांचा खास ‘स्पोर्ट्स डे’ साजरा

पुणे :

पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या सन्मती बाल निकेतन संस्थेतील मुलांसोबत उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेच्या वतीने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिब्लिटी CSR) उपक्रमांतर्गत आज ‘स्पोर्ट्स डे’ साजरा केला. यावेळी सन्मती बाल निकेतन संस्थेतील मुलांनी क्रिकेट, बॅडमिंटन, बुद्धीबळ, कॅरम आदि खेळांचा आनंद लुटला. 

 

या प्रसंगी उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेच्या वतीने
वैभव भगत, योगेश गुरधळकर, गणेश मोरे तसेच सन्मती बाल निकेतन संस्थे कडून मनिषा नाईक, सीमा घाडगे आदि मान्यवर उपस्थित होते. 

या  ‘स्पोर्ट्स डे’ निमित्त उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेतील कर्मचाऱ्यांच्या क्रिकेट टीम सोबत सन्मती बाल निकेतन संस्थेतील मुलांचे ‘माई’ज्  वॉरीयर्स आणि ‘माई’ज्  डायमंड असे दोन क्रिकेट संघ सहभागी झाले होते. तर लाहानग्यांनी इतर खेळात सहभाग घेवून  ‘स्पोर्ट्स डे’ चा आनंद लुटला.  

तसेच यावेळी उज्जीवन स्मॉल फायनान्स बँके कडून सन्मती बाल निकेतन संस्थेतील मुलांना क्रिकेट, बॅडमिंटन, बुद्धीबळ, कॅरम यांसारख्या विविध क्रीडा साहित्य भेट देण्यात आले.

You may have missed