हिंजवडी :
हिंजवडी पोलीस स्टेशनचे पोलीस अमंलदारं / २६५९ रवी पवार यांना मिळालेल्या खात्रीशीर माहिती नुसार सुमारे ३१ किलो १०० ग्रॅम गांजासह ऐकून १४,३८,०००/- रुपये चा मुद्येमाल जप्त करुन दोघांना अटक करण्यात आली.
पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड हददीत चालणारे अवैध धंदे विरुध्द कारवाई करुन अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्याचे मा. पोलीस आयुक्त साो पिंपरी चिंचवड यांचे आदेश असलेने त्या अनुषंगाने हिंजवडी पोलीस स्टेशन
कडील अवैध धंदे विरोधी पथकाचे पोलीस अधिकारी व अमंलदार हे पोलीस स्टेशन हददीत चालणारे अवैध धंदेची
माहीती घेत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अमंलदारं / २६५९ रवी पवार यांना बातमीदारा मार्फत माहीती मिळाली
की, वाकडकर वस्ती येथे एक इसम त्याचे जवळ पांढ-या रंगाचे टेम्पो क्रमांक एम.एच १४, एच. यु २५५३ मधुन गांजा
घेवुन विक्रीसाठी येणार आहे. अशी माहीती मिळाल्याने त्याबाबत खात्री झाल्याने मिळालेली बातमी सपोनिरीक्षक खटाळ यांनी मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोळ सो, हिंजवडी पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड यांना कळवीली.
त्यांनी मार्गदर्शन करुन पुढिल कारवाई करणेचे आदेश दिलेनंतर सहा पोलीस निरीक्षक खटाळ व पोलीस स्टाफ असे छापा करवाईचे साहीत्य व दोन पंचासह मिळालेले बातमी प्रमाणे ठिकाणा जवळ जाऊन थांबुन ट्रॅप लावला असता वाकडवस्ती, वाकड ब्रिज कडुन भुमकर चौकाकडे जाणारे रस्त्याने एक पांढ-या रंगाचा पिक अप हा रस्त्याने जात असताना टेंम्पो चालकास थांबुन त्यातील चालक यास गाडीतुन खाली उतरवुन चौकशी केली असता त्याने गाडीत भाजीपाल्याचा कचरा आहे असे खोटे सांगु लागला पोलीसांना संशय आलेने गाडीत पाठीमागील भागात असलेल्या पांढ-या रंगाच्या पिशवींची झडती घेतली असता गाडीतील पांढ-या रंगाचे नॉयलॉनच्या पिशवीमध्ये ब्राऊन रंगाचे चिकट पटटीने गुंडाळलेले एकुण १७ पुडे मिळुन आले ते पुडे फोडुन पाहीले असता त्यामधे सुमारे ३१ किलो १०० ग्रॅम गांजा मिळुन आला टेम्पो चालकाचे ताब्यातुन टेम्पो व गांजासह एकुन १४,३८,०००/- रुपये चा मुद्येमाल जप्त करुन त्यांचे विरुध्द व गांजा मालक याचे विरुध्द एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८ ( क ), २० (ब) (ii) ( क ), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला असुन सदर अरोपींची नावे खालीलप्रमाणे.
१) मैनुददीन अब्दुल सत्तार, वय – २३ वर्षे, मुळ रा- गील्हाबारी, वार्ड नंबर ३ थाना जियापोखर,ठाकुरगंज, जिआपोखर किशनगंज, बिहारहल्ली मुक्काम शंकर यांचे पत्राचे रुम मध्ये, एक्युअर कंपणी जवळ, फेज २ हिंजवडी, पुणे.
२)बिपलभ बिधन राणा व.व.२४, रा- एमक्युर कंपणी जवळ, पत्राचे रुममध्ये फेज २ हिंजवडी, पुणे.
सदरची कारवाई मा.विनयकुमार चौबे सो, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. संजय शिंदे सह पोलीस आयुक्त
सो, मा. वसंत परदेशी सो, अप्पर पोलीस आयुक्त साो. मा. काकासाहेब डोळे सो, पोलीस उप आयुक्त परि. २,
मा. विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त, वाकड विभाग वाकड, यांचे मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. श्रीराम पोळ, सुनिल दहिफळे पोलीस निरीक्षक सोन्याबापु देशमुख पोलीस निरीक्षक, अवैध धंदे विरोधी पथकाचे प्रमुख सपोनि अजितकुमार खटाळ, सहा. पोलीस उपनिरीक्षक महेश वायबसे, पोहेकॉ/१०४१ संतोष डामसे, पोलीस अमंलदार / २६५९ रवी पवार यांनी केली आहे.
More Stories
नांदे गावच्या युवा महिला सरपंच निकिता रानवडे यांची राष्टृवादी शरदचंद्र पवार गटाच्या जिल्हा युवती कार्याध्यक्षपदी निवड..
विद्यार्थांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवण्यासाठी पेरीविंकल स्कूलचा प्रयत्न, विज्ञानदिना निमित्त विज्ञान प्रदर्शनाचे पिरंगुट शाखेत आयोजन..
पेरिविंकल च्या पौड शाखेत शिवजयंती दिमाखात साजरी!!!