नांदेगाव :
नांदेगावच्या सरपंच निकिता रानवडे यांच्या वाढदिवसानिमित्त खेळ पैठणीचा हा कार्यक्रम माजी सरपंच प्रशांत रानवडे आणि शेखर रानवडे मित्र परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. नांदे गावच्या इतिहासात प्रथमच एवढा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महिलांनी मोठया उत्साहात या कार्यक्रमाचा आनंद उपभोगला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन झी मराठी फेम चैत्राली माजगावकर यांनी केले.
वाढदिवसाची सुरूवात जि. प. शाळा नांदे येथे शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासोबत केक कापुन करण्यात आली.
दैनंदिन जीवनातील कामात व्यस्त असताना महिलांना घरा व्यतिरिक्त इतर गोष्टींकडे लक्ष देता येत नाही. दररोजच्या कामाच्या व्यापातून थोडासा आनंद महिला भगिनींना मिळावा म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला होता. महिलांनी मोठया उत्साहात कार्यक्रमात सहभागी होऊन आनंद घेतला व बक्षीस मिळवले. माझ्या महिला भगिनींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून वाढदिवसाचा कार्यक्रम सार्थकी लागल्याचे समाधान मिळाले. परिसरातील लहान थोर सर्वांनी मोठया प्रमाणात दिलेल्या शुभेच्छा मला समाजाप्रती चांगले काम करण्याची प्रेरणा देतात : निकिता शेखर रानवडे (सरपंच नांदेगाव)
यावेळी नांदेगावच्या उपसरपंच पदी निवड झालेल्या संघमित्रा ओव्हाळ यांचा नागरिक सत्कार करण्यात आला. तसेच कोंढुर गावच्या पोलीस पाटील पदी राधिका कोंढरे आणि नेरे गावच्या पोलीस पाटील पदी दिपाली जाधव यांची निवड झाली म्हणून ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी घेतलेल्या खेळ व स्पर्धांमध्ये मानाची येवला पैठणी पटकावण्याचा मान सुजाता घोरपडे यांना मिळाला.
स्पर्धेची विजेते पुढीलप्रमाणे :
प्रथम क्रमांक : सुजाता घोरपडे
द्वितीय क्रमांक : जयश्री ठाकरे (गॅस शेगडी)
तृतीय क्रमांक : सारिका मुंडे (ॲक्वागार्ड)
चतुर्थ क्रमांक : सुप्रिया वाकडे मिक्सर
पाचवा क्रमांक : अश्विनी खोमणे डिनर सेट
यावेळी लकी ड्रॉ काढून पाच बक्षिसे काढण्यात आली
१)कल्याणी पारखी
२)संगीता पन्हाळे
३)रूपाली रानवडे
४)आकांक्षा मोहोळ
५)रेखा काऱ्हाळे
यांना बक्षीस देउन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय करंजावणे व स्वप्नील तापकीर यांनी केले व आभार अविनाश करंजावणे यांनी मानले
या कार्यक्रमाला महादेव कोंढरे, पी.डी.सी.सी बँक उपाध्यक्ष सुनील चांदेरे, शिवसेना(ऊ.बा.ठा गट) संपर्क प्रमुख शंकर मांडेकर, लक्ष्मण ठोंबरे, गंगाराम मातेरे, सविता दगडे, राधिका कोंढरे, कोमल साखरे, कोमल वाशिवले, दिपाली जाधव, सारिका मांडेकर, संजय सातव, सुहास दगडे, अशोक ओव्हाळ, प्रसाद खानेकर, राम गायकवाड, नांदे गावातील सर्व पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमात विविध प्रकारचे खेळ गाणी नृत्य विनोद उखाणे अशा विविध प्रकारच्या गोष्टी घेण्यात आल्या यावेळी विशेष आकर्षण असलेली येवला पैठणी मिळविण्यासाठी महिलांमध्ये जोरदार स्पर्धा पाहायला मिळाली.
More Stories
नांदे गावच्या युवा महिला सरपंच निकिता रानवडे यांची राष्टृवादी शरदचंद्र पवार गटाच्या जिल्हा युवती कार्याध्यक्षपदी निवड..
विद्यार्थांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवण्यासाठी पेरीविंकल स्कूलचा प्रयत्न, विज्ञानदिना निमित्त विज्ञान प्रदर्शनाचे पिरंगुट शाखेत आयोजन..
पेरिविंकल च्या पौड शाखेत शिवजयंती दिमाखात साजरी!!!