March 21, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

नांदेगावच्या उपसरपंच पदी सौ संघमित्रा अजित ओव्हाळ यांची बिनविरोध निवड…

नांदेगाव :

नांदेगावच्या उपसरपंच पदी सौ. संघमित्रा अजित ओव्हाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नांदेगाव चे माजी सरपंच प्रशांत रानवडे यांच्या नेतृत्वाखाली ही निवड करण्यात आली.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रवींद्र देशमुख (ग्रामसेवक) यांनी काम पाहिले. तर विद्यमान सरपंच सौ निकिता शेखर रानवडे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली. निवडणुकीमध्ये केवळ सौ संघमित्रा ओव्हाळ यांचाच अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी देशमुख यांनी जाहीर केले. ग्रामस्थांच्या वतीने बिनविरोध निवड झालेल्या उपसरपंच संघमित्रा ओव्हाळ यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी मारुती रानवडे (मा. सरपंच), सचिन डांगे, पो पाटील दत्तात्रय रानवडे, तंटामुक्ती चे भानुदास करंजावणे, ग्रामविकास चे रोहीदास रानवडे, निवृत्ती ओव्हाळ, शेखर रानवडे, निखील रानवडे, समीर करंजावणे, योगेश ओव्हाळ, विकास खोमणे, दत्ता माकर, संकेत माकर आदी मान्यवर उपस्थित होते.