April 23, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

आम आदमी पार्टी आणि पुणे महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने राबविला “स्वच्छता अभियान उप्रकम”

पुणे :

संत गाडगे महारज जयंतीचे औचित्य साधून, कोंढवा बुद्रुक परीसरातील सर्व्हे नं. ०५, अश्रफ नगर, ग्रीन पार्क, अजमेरा पार्क, मिलन पार्क, शेर-खान चाळ या ठिकाणी आम आदमी पार्टी आणि पुणे महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने *”स्वच्छता अभियान उप्रकम”* राबविला आला. या अनुषंगाने ठीक-ठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढिग साफ करून घेतले‌. स्थानिक नागरीकांशी संवाद साधून त्यांना भेडसावत असलेल्या समस्या जाणून घेतल्या.

 

या प्रभागातील जनतेला सर्वाधिक त्रासदायक प्रश्न हे पाणी आणि स्वछता हाच आहे. या वेळी आम आदमी पक्षाचे शहर अध्यक्ष श्री. सुदर्शन जगदाळे यांनी जनतेला विश्वास दिला की, आम आदमी पार्टी पुणे च्या वतीने जनतेचे पाणी आणि कचऱ्या संबंधीचे प्रश्न आहेत मार्गी लावून देतील. यासाठी आम आदमी पार्टी कटीबद्ध आहे.

या कार्यक्रमाच्यावेळी उपस्थिस आम आदमी पार्टी कोंढवा टीम आणि पुणे टीम तसेच महानगर पालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी तसेच स्थानिक नागरीक
मुफ्ती मन्सूर इनामदार, समीर आरवाडे, आसिफ बागवान, अमोल मोरे, फहीम खान, गणेश थरकूड़े , सचिन कोतवाल, शाहनवाझ शेख, सतीश यादव, आरीफ आरवाडे, सचिन भोंडे, मुस्तफा साचे, फिरोज आरवाडे, मोईन खान, जहीर सय्यद, इम्रान आरवाडे, फिरोज सय्यद, आजीम इनामदार, मस्तान पठाण, जमीर खान, ॲड. राशिदा सिद्दीकी, अली सय्यद, वसीम शेख यानी या उपक्रमात सहभाग घेतला.