November 22, 2024

Samrajya Ladha

मॉडर्न हायस्कूल इंग्रजी माध्यम पुणे ५ चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न..

बालगंधर्व :

बालगंधर्व रंगमंदिर येथे पी ई सोसायटीच्या मॉडर्न हायस्कूल इंग्रजी माध्यम पुणे ५ चे वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. यामधे भारतीय गुरुकुल ते एनईपी शिक्षण पद्धतीचा प्रवास,अनेकता मे एकता, शेतकऱ्यांच्या समस्या आणि उपाय, भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा रोमांचकारी इतिहास,
अंतराळातील भारताची इस्रोची झेप या विविध विषयांवर अतिशय उत्साहात इ. ५ वी ते इ. ९ वी च्या विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन सादर केले आणि प्रमुख पाहुणे, पालक, विद्यार्थ्यांची मने जिंकून घेतली.

अतुल्य भारत’ या संकल्पनेवर आधारित विद्यार्थ्यांनी भारताच्या विविध राज्यांतील लोकसंस्कृती, भारतातील विविध क्षेत्रांतील प्रगतीचा आलेख यांचे दृकश्राव्य माध्यमांच्या सहाय्याने मनोवेधक रुपात सादरीकरण केले.

‘भारताची संस्कृती, कला जपण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे. आपण समाजाचे, पूर्वजांचे काही देणे लागतो याचे भान ठेवून भारताच्या सर्वोच्च प्रगतीसाठी प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे.’ अशा प्रेरणादायी शब्दात प्रमुख पाहुणे लेखक, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या प्रसंगी नंदिनी वस्राद, निल खांबेटे यांना सर्वोकृष्ट विद्यार्थी तर लाॅन टेनिस नॅशनल लेव्हल सेकंड प्लेस विजेत्या जय गायकवाड या विद्यार्थ्यास गौरविण्यात आले.

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष प्रो. डॉ. गजानन एकबोटे, सचिव प्रा. शामकांत देशमुख, सहकार्यवाह प्रो. डॉ. ज्योत्स्ना एकबोटे यांचे मार्गदर्शन या कार्यक्रमाला लाभले. सहकार्यवाह प्रा सुरेश तोडकर, उपकार्यवाह प्रो. डॉ. प्रकाश दीक्षित, डॉ. नंदुभाऊ एकबोटे, प्रा. दिपक मराठे हे नियामक मंडळाचे सदस्य मुख्याध्यापिका सौ. माधुरी शहा हे कार्यक्रमास उपस्थित होते.