November 22, 2024

Samrajya Ladha

पुण्याच्या पालकमंत्री पदी उपमुख्यमंत्री अजित पवार…

मुंबई :

राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.

पालकमंत्री पदासाठीची यादी प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर मनासारखा जिल्हा न मिळाल्यामुळे अजित पवार, दादा भुसे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली होती. पुण्याचे पालकमंत्रिपद जरी चंद्रकांत पाटील यांच्याकडे असले तरी अजित पवार सुपर पालकमंत्री असल्यासारखे वागताना दिसत होते. त्यानंतर पुण्याच्या पालकमंत्रीपदावरून दोघांमध्ये चढाओढ पाहायला मिळाली.

राज्यातील महायुतीच्या सरकारमध्ये अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा आहेत. अजित पवारांनी गणेशोत्सवाच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गणपतीच्या दर्शनाला जाण्याचं टाळले. तसेच मंगळवारी झालेल्या राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही त्यांनी दांडी मारली. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर गेले आणि अनेक महिन्यांपासून रखडलेला पालकमंत्री पदाचा तिढा सुटला

सुधारित 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे

पुणे- अजित पवार
अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील
सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील
अमरावती- चंद्रकांत दादा पाटील
भंडारा- विजयकुमार गावित
बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील
कोल्हापूर- हसन मुश्रीफ
गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम
बीड- धनंजय मुंडे
परभणी- संजय बनसोडे
नंदूरबार- अनिल भा. पाटील
वर्धा – सुधीर मुनगंटीवार