September 8, 2024

Samrajya Ladha

अँड. मारुती आबा गोळे यांना शिवप्रताप भूषण पुरस्काराने सन्मानित व पोलिस उपनिरीक्षक सुधीर साठे यांचा विशेष सत्कार.

कोथरुड :

अभिजीतदादा कदम मित्र मंडळ व प्रतिष्ठान व डॉ पतंगराव कदम महिला कबड्डी संघाच्या क्रीडांगण सत्यनारायण महापूजा व आजी माजी खेळाडू मेळाव्यानिमीत्ताने छञपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे पायदळ प्रमुख सरनौबत पिलाजीराव गोळे यांचे १४ वे वंशज अँड. मारुती आबा गोळे यांना अँड गणेश मारणे व नयना ताई सोनार यांच्या हस्ते शिवप्रताप भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.तसेच संस्थेचे माजी खेळाडू सुधीर साठे यांची महाराष्ट्र पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल अंकुश गजमल, अजय हुलावळे व सुरज कळञे यांचा हस्ते विशेष सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

छञपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे पायदळ प्रमुख सरनौबत पिलाजीराव गोळे यांचे १४ वे वंशज अँड. मारुती आबा गोळे हे छञपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेचा इतिहास तरून पिढीच्या स्मरणात राहावा यासाठी गरुडझेप मोहिमेच्या माध्यमातून गेल्या ४ वर्षापासून अनेक शिवभक्ताना एकञ करून आग्रा येथून पळत शिवज्योत घेऊन अवघ्या १७ दिवसात राजगडावर आणली जाते. या प्रतापाची दखल घेऊन अभिजितदादा कदम मित्र मंडळ व प्रतिष्ठानच्या वतीने अँड मारूती आबा गोळे यांना शिवप्रताप भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अँड. मारुती गोळे यांनी यावेळी बोलताना सांगीतले की, छञपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणादायी इतिहासाची व गड किल्ल्याची माहिती सांगून महाराजांना हि खुप वेळा अपयश आले पण त्यांनी प्रयत्न सोडले नाही. त्यांचेच अनुकरण खेळाडूंनी आपल्या जीवनात केले पाहिजे.

पोलिस उपनिरीक्षक सुधीर साठे यांनी खेळाडूंना खेळा बरोबर स्पर्धा परीक्षेचे महत्त्व पटवून सांगितले.

यावेळी संस्थेचे माजी खेळाडू खेळाच्या माध्यमातून पोलिस दलात नोकरीत रुजू असले गणेश तळेकर, महेश चोरघे यांचा सत्कार संकेत करवते प्रथमेश कुडले व योगेश लुगडे यांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी सागर गोळे (सदस्य पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन), नीकुज उभे (अध्यक्ष हावेली कुस्ती संघ), जावेद शेख (मैञी क्रिकेट प्रतिष्ठान) सुरेश राऊत (उपध्याक्ष लोकश्री क्रीडा ज्ञानपीठ) सचिन यादव (उपध्याक्ष पुणे शहर क्रीडा राष्ट्रवादी) उपस्थितीत होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा सागर खळदकर सुञसंचलान राष्ट्रीय खेळाडू शाकिर शेख व आभार सत्यम देवकर यांनी मानले.