September 17, 2024

Samrajya Ladha

पेरिविंकलच्या सर्व शाखेत शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षक -गुरूंचा सन्मान!!!

बावधन :

चैतन्य विद्या प्रतिष्ठान च्या पेरिविंकल इंग्लीश मिडीयम स्कूल अँड ज्यु.कॉलेज च्या सूस, बावधन ,पिरंगुट ,पौड ,
कोळवण माले अशा सहा शाखेमध्ये शिक्षक दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला .

दरवर्षी ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो .आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आणि अडचणीतून बाहेर पडण्यासाठी वाट दाखविणारे गुरुजनाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा हा दिवस़………
सालाबादप्रमाणे यावर्षीही पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स च्या सर्व शाखांमध्ये शिक्षक दिन सोहळा साजरा करण्यात आला.

शाळेतील विद्यार्थी गुरूजनांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उत्सुक होते. विद्यार्थ्यांनी सर्व गुरुजन शिक्षकांना पारंपरिक औक्षण करून फुलांच्या पायघड्या घालून शिक्षक व गुरुजनांचे स्वागत केले .

कार्यक्रमाचा प्रारंभ सरस्वती पूजन व सर्वेपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला. दीप प्रज्वलन करून मान्यवरांनी प्रतिमेचे पूजन केले.

या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा . श्री.राजेंद्र बांदल सर, संचालिका सौ. रेखा बांदल मॅडम, शाळेच्या डायरेक्टर कु.शिवानी बांदल तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित , अभिजीत टकले व स्वाती कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरवात विद्यार्थ्याच्या बहारदार नृत्याने करण्यात आली. इयत्ता 12वी तील व 10वी तील विद्यार्थ्यांनी बहारदार पर्फॉर्मेन्स सादर केले .
शिक्षक दिनाचे औचित्य साधून शाळेतील सर्व गूरूजन- शिक्षकांचा शाळेकडून सन्मान करण्यात आला .शाळेचे संस्थापक श्री बांदल सर व संचालिका सौ रेखा मॅडम यांच्या हस्ते सर्व शिक्षकांना विश्वासाचे प्रतीक म्हणून भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले .

शिक्षक दिनाच्या दिवशी सर्व विद्यार्थी शिष्यांसमोर गूरूजनां च्या हस्ते असा सन्मान मिळणे हाच खरा शिक्षकांचा आदर असे प्रतिपादन करून शिक्षकांचे जीवनातील महत्व काही शिक्षकांनी त्यांच्या भाषणात मनोगत व्यक्त करताना केले.

तर शिक्षकांच्या आज्ञेचे पालन करून निशंक मनाने काम केल्यास प्रगतीच होते व गुरुबळ म्हणजे काय याची प्रचिती येते तसेच एक शिक्षक राष्ट्रपती होऊ शकतो व राष्ट्रपती पदावरून गेल्यावर सुद्धा एक शिक्षक होऊ शकतो व पुढील अनेक राष्ट्रपती ,इंजिनियर, डॉक्टर घडवू शकतो. अनेक पिढ्या शिक्षक लक्षात ठेवतात येवढी ताकद एका शिक्षकात असते त्यामुळे हे अत्यंत मानाचे प्रतीक असून शिक्षकी पेशा हा केवळ नशीबवान लोकांनाच उपभोगता येतो असे संस्थेचे अध्यक्ष श्री राजेंद्र बांदल यांनी त्यांच्या भाषणात
सांगितले व सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

तर आपली संस्कृती जपून शिक्षक दिन शाळेत साजरा करून शाळेचे हे सगळे नयनरम्य कार्यक्रम अनुभवायला मिळाल्याने शाळेच्या डायरेक्टर शिवानी मॅडम यांनी सर्वांचे आभार मानून सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सांगता पवन करडे यांच्या सुमधुर गीताने करण्यात आली.

संपूर्ण कार्यकमाचे नियोजन शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र बांदल व संस्थापिका सौ रेखा बांदल यांच्या अध्यक्षतेखाली शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित,अभिजीत टकले ,स्वाती कोल्हे ह्यांच्या नेतृत्वाखाली सर्व शाखेमधील सर्व पर्यवेक्षक, शिक्षकवृंद व विद्यार्थीगण ह्यांच्या सहकार्याने अतिशय आनंदात व शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाला.