बाणेर :
बाणेर टेकडी पायथ्याशी असलेल्या वेंटेज सोसायटीसमोरील रस्त्यावर अनेक दिवसांपासून पथदिवे नसल्याने नागरिकांना रात्रीच्या वेळी ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत होता, तसेच भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर, माजी नगरसेविका सौ. ज्योती गणेश कळमकर यांच्या पाठपुराव्यामुळे या रस्त्यावरील विद्युत दिवे कार्यान्वित झाले आहेत.
बाणेर टेकडीकडून पाषाणकडे जाणाऱ्या या रस्त्यावर पथदिव्यांची सोय नसल्यामुळे वेंटेज सोसायटीमधील रहिवाशांनी आपली अडचण कळमकर यांच्या निदर्शनास आणली होती. नागरिकांशी संवाद साधल्यानंतर कळमकर यांनी या समस्येचे गांभीर्य ओळखले. त्यांनी तात्काळ पथ विभाग आणि विद्युत विभागाकडे पाठपुरावा करत या रस्त्यावर पथदिवे बसवून ते सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या अथक प्रयत्नांना यश आले असून, आज हे पथदिवे कार्यान्वित करण्यात आले आहेत.
पथदिवे सुरू झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी, विशेषतः महिला भगिनींनी सौ. ज्योतीताई कळमकर यांचे आभार मानले आहेत. या सुविधेमुळे आता नागरिकांना रात्रीच्या वेळी सुरक्षितपणे ये-जा करता येणार आहे.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी