November 21, 2024

Samrajya Ladha

मावळ येथे साहित्यरत्न डॉ. आण्णा भाऊ साठे जयंती निमित्त रमेशतात्या गालफाडे यांना फकिरा पुरस्काराने तर रंजनाताई नेटके यांना सत्यशोधक मुक्ता साळवे पुरस्कार देऊन केले सन्मानीत..

मावळ :

साहित्यरत्न डॉ. आण्णा भाऊ साठे यांची 103 वी जयंती महोत्सव दिनांक 27/08/2023 रोजी अध्यक्ष श्री. महेशदादा राजगुरु व महिला उपाध्यक्षा सौ. मंगलताई रुपटक्के यांच्या नेतृत्वाखाली दणक्यात साजरी झाली. रमेशतात्या गालफाडे यांना फकिरा पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

यावेळी नेटके परिवारातील आदर्श माता व शिक्षक व्यक्तिमत्व श्रीमती रंजनाताई नेटके यांना सत्यशोधक मुक्ता साळवे पुरस्कार देऊन सन्मानीत केले गेले. रंजनाताईच्या कार्याचा गुण गौरव केला.

कार्यक्रमानिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. रथामध्ये आण्णासाहेबांचा सुंदर फोटो. पुढे सूमधुर पारंपारिक वाद्य त्यापुढे जबरदस्त डी जे साऊंड आणि ठेक्यात चाललेला ढोलताश्याचा गजर आणि सर्व समाज बांधवांनी बांधलेले पिवळे फेटे अशी खुप मनमोहक मिरवणूक काढण्यात आली.

सभागृहात सूनियोजन पाहावयास मिळाले. छोट्या मुलींची भाषणे खुप छान झाली. पुरस्कार मूर्तीची भाषणे झाली. आणि शेवटी स्नेहभोजन व्यवस्था करण्यात आली होती. मावळ तालुक्यातील समस्त मातंग समाजबांधवांनी एकत्र येऊन दिमाखदार असा भव्यदिव्य सोहळा पार पडला.