सोमेश्वरवाडी :
शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या वतीने सोमेश्वर मंदिर प्रांगण, सोमेश्वरवाडी, पाषाण येथे अक्षय ब्लड बँकेच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या सामाजिक उपक्रमात मोठ्या संख्येने तरुण मावळ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत, स्वराज्याला मानवंदना म्हणून तब्बल ११०४ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी बोलताना सातत्याचे महत्त्व अधोरेखित केले. “सनी निम्हण गेली पाच वर्षांपासून सातत्याने शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करत आहे. रक्तदानासारखं पुण्याचं कार्य दुसरं काही नाही. रक्त हे तयार करता येत नाही, त्यामुळे रक्तदान हाच रक्ताचा एकमेव स्रोत आहे. म्हणूनच हे फार मोठं आणि पवित्र कार्य आहे,” असे म्हणत त्यांनी सनी निम्हण यांच्या मौल्यवान योगदानाचे मनापासून कौतुक केले.
याप्रसंगी दत्तात्रय गायकवाड (माजी महापौर), माजी नगरसेवक अमोल बालवडकर, भाजपा पुणे शहर सरचिटणीस गणेश कळमकर, भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडळ अध्यक्ष लहू बालवडकर, माजी अध्यक्ष सचिन पाषाणकर, राहुल कोकाटे, वसंतराव जुनवणे, शहाजी रानवडे, सुहास निम्हण, सोमेश्वर देवस्थानचे अध्यक्ष पोपटराव जाधव, खंडूशेठ आरगडे, ज्ञानेश्वर पारखे, मनोहर आरगडे, शांताराम महाराज निम्हण, पांडुरंगअप्पा दातार, औंध गाव विश्वस्त मंडळ अध्यक्ष राहुल गायकवाड, योगेश जुनवणे, महेंद्र जुनवणे, सुप्रीम चोंधे, गिरीश जुनवणे, रणजीत कलापुरे, हेरंब शेळके, विशाल शिंदे, सचिन वाडेकर, जयप्रकाश निम्हण, अशोक दळवी, भरत जोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
सनी विनायक निम्हण यांच्या या सामाजिक उपक्रमामुळे समाजात एक चांगला संदेश गेला असून, रक्तदानासारख्या पवित्र कार्यासाठी नागरिकांना प्रेरणा मिळाली आहे.



More Stories
“उच्च तंत्र की तंत्रमंत्र? अमोल बालवडकरांचा भोंदू खरात सोबत फोटो वरून चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा”
औंध ग्रामदैवत भैरवनाथ महाराज उत्सव ३ मे रोजी; ग्रामसभेत तारीख जाहीर
लहानग्यांच्या स्वप्नांना मिळाले पंख: पेरिविंकल पिरंगुटमध्ये सीनियर केजी ग्रॅज्युएशन डे जल्लोषात साजरा!!!