सोमेश्वरवाडी :
कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण तथा संसदीय कार्य मंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आणि वसुंधरा सप्ताहाचे औचित्य साधून सोमेश्वरवाडी येथील रामनदी किनारी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री सचिन दळवी सोशल फाऊंडेशन आणि रामनदी स्वच्छ अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी, श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपणाचे महत्त्व त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
या कार्यक्रमाला कोथरूड (उ) मंडल अध्यक्ष लहू आण्णा बालवडकर, माजी अध्यक्ष सचिनजी पाषाणकर, सचिन दळवी, राहुल कोकाटे, रोहन कोकाटे, मधू दळवी, भोसले काका, ब्रिजेश दिक्षित आणि वसुंधरा अभियान व सचिन दळवी सोशल फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांची विशेष उपस्थिती होती. या उपक्रमामुळे रामनदी किनारी हरितपट्टा वाढण्यास मदत होईल आणि पर्यावरणाच्या संरक्षणाबाबत जनजागृतीही होईल, अशी आशा आयोजकांनी व्यक्त केली.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!