पिरंगुट :
पिरंगुट, पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पिरंगुट यांच्या वतीने इ. १ ली ते १० वीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी पालक मार्गदर्शन कार्यक्रम दिनांक ९ जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे आयोजन सुरभि बॅन्क्वेट हॉल, पिरंगुट येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमात शैक्षणिक वर्ष २०२५–२६ मध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिक्षणपद्धती, उपक्रम, तसेच शाळेच्या धोरणांची माहिती पालकांना देण्यात आली.
शाळेचे संस्थापक श्री. राजेंद्र बांदल, संचालिका रेखा बांदल, संचालिका शिवानी बांदल यांच्या सहकार्याने पालकांसाठी पालक मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्यात आला.प्राचार्या आसावरी हंचाटे यांच्या मार्गदर्शनाने आणि प्रेरणादायी शब्दांनी पालकांना आगामी वर्षाची स्पष्ट दिशा मिळाली .
शाळेच्या संचालिका रेखा बांदल आणि शिवानी बांदल यांनी दिलेली माहिती प्रेरणादायक होती.या उपक्रमामुळे शाळा आणि पालक यांच्यातील सुसंवाद अधिक दृढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“शाळा आणि पालक यांच्यातील सहकार्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल, याची आम्हाला खात्री वाटते. अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही आयोजित करावेत, हीच आमची अपेक्षा आहे शाळेचा शिस्तप्रिय व मूल्याधिष्ठित दृष्टिकोन पाहून आम्ही अतिशय आनंदी व समाधानी आहोत “. अशा प्रकारची मते पालकांनी व्यक्त केली
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम.सीमा कांबळे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्या आसावरी हंचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक विभागप्रमुख पूनम पांढरे, प्राथमिक विभागप्रमुख सना इनामदार, पूर्व प्राथमिक विभागप्रमुख पल्लवी नारखेडे,शिक्षकेतर कर्मचारी रुपाली देवकर व रुपाली राऊत तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.



More Stories
योगीराज पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप….
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, सूस येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा भावस्पर्शी निरोपसमारंभ सोहळा संपन्न.
“शिक्षणाबरोबरच मूल्यसंस्कार घडले तरच विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होते” – मा. आमदार शरद ढमाले