August 28, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

ई-रिक्षा घेणाऱ्या १० महिलांना अनुदान वगळून लोकसहभागातून अर्थसहाय्य करणार : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे :

पुणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नॅशनल क्लिन एअर प्रोग्राम अंतर्गत मिस्ट बेस्ड फाउंटन सिस्टिमचे उद्घाटन आणि इलेक्ट्रिक पॅसेंजर रिक्षांसाठी अनुदान वाटप पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

 

पुणे शहरात ई-रिक्षा घेणाऱ्या १० महिलांना ई-रिक्षासाठी मिळणारे अनुदान वगळून इतर रक्कम लोकसहभागातून उपलब्ध करून देण्यात येईल – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील 

याप्रसंगी मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, विकास ढाकणे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नितीन शिंदे, ‘एआरएआय’चे जितेंद्र पुरोहित, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी राजेंद्र मुठे, पर्यावरण विभागाचे उपायुक्त माधव जगताप आदी उपस्थित होते.

 

You may have missed